PM Vishwakarma Yojana पीएम विश्वकर्मा योजना १७ सप्टेंबर ला योजनाची सुरवात
पिएम विश्वकर्मा योजना? कोण आहेत लाभार्थी जाणून घ्या
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पासून सत्तेत आले आहेत तेव्हापासून त्यांनी देशात विविध प्रकारच्या योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री जन धन योजना असेल,सुरक्षा विमा योजना असेल,अटल पेंशन योजना,प्रधानमंत्री मुद्रा योजना,पीक विमा योजना,स्टॅन्ड अप इंडिया योजना यांसारख्या अनेक योजना त्यांनी आत्ता पर्यंत राबवल्या आहेत व अनेक नागरिकांनीही या योजनांचा लाभ घेतला आहे.
त्यातच त्यांनी १५ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे लाल किल्यावर झालेल्या स्वातंत्र दिनादिवशी भाषणा दरम्यान विश्वकर्मा योजनेची घोषण केली येणाऱ्या विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी विश्वकर्मा योजना सुरु करणारअसल्याचे त्यांनी सांगितले. उद्या १७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंती असल्याने उद्या पासून या योजनेला सुरवात होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी असे म्हणतात कि, परंपरेतून चालत आलेल्या गोष्टी हाताने,अवजारे किंवा उपकरणे वापरून काही न काही निर्माण करणारे करोडो विश्वकर्मा या देशाचे निर्माते आहेत. आपल्याकडे लोहार,सोनार,कुंभार,शिल्पकार,कारागीर,गवंडी,इत्यादी लोकांची मोठी यादी आपल्याकडे आहे. या सर्व विश्वकर्मांच्या मेहनतीला पाठिंबा देण्यासाठी देशाने प्रथमच विविध प्रोत्साहन योजना आणल्या आहेत. अशा लोकांसाठी प्रशिक्षण, तंत्रज्ञानाविषयी संबंधित माहिती, वित्तपुरवठा आणि बाजार समर्थनासाठी तरतूद करण्यात आल्या आहे. पिएम विश्वकर्मा सन्मान योजना करोडो विश्वकर्मांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणतील. विश्वकर्मा सन्मान योजनेचा लाभ जास्तीत जास्त कारागीर व शिल्पकार वर्गाने घ्यावा असे आव्हान देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
काय आहे विश्वकर्मा योजना जाणून घेऊया.
विश्वकर्मा योजनेचा उद्देश हा कारागीर आणि शिल्पकार यांना आर्थिक सहाय्य,मान्यता,कौशल्य प्रशिक्षण,क्रेडिट सपोर्ट,मार्केटिंग सहाय्य प्रदान करून देणे आणि त्यांचे समर्थन करणे हा आहे . कारागीर आणि शिल्पकार यांची विश्वकर्मा म्हणून ओळख निर्माण करणे आणि त्यांना योजनेतील सर्व लाभ मिळण्यास पात्र बनवणे. त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना संबंधित तंत्रज्ञानाविषयी माहिती देणे आणि योग्य प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देणे. त्यांची क्षमता, उत्पादकता आणि उत्पादनांची गुणवत्ता वाढविण्यासाठी चांगल्या आणि आधुनिक साधनांसाठी समर्थन करणे. या विश्वकर्मांच्या डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे.
PM Vishwakarma Yojana योजनेचे फायदे
विश्वकर्मा योजनेची ओळख हि प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे केली जाईल. कौशल्य पडताळणीनंतर ५ ते ७ दिवस मूलभूत प्रशिक्षण दिले जाईल. इच्छुक उमेदवार 15 दिवसांच्या प्रगत प्रशिक्षणासाठी देखील नावनोंदणी करू शकतात.प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवाराला ५०० रुपये प्रतिदिन देण्यात येतील. नॅशनल कमिटी फॉर मार्केटिंग (NCM) गुणवत्ता प्रमाणन, ब्रँडिंग आणि प्रमोशन, ई-कॉमर्स लिंकेज, ट्रेड फेअर्स जाहिराती, प्रसिद्धी आणि इतर यासारख्या सेवा प्रदान करण्यात येतील. एंटरप्राइझ डेव्हलपमेंट कर्ज देण्यात येईल त्यामध्ये 1 लाख रुपयांच्या कर्जासाठी 18 महिन्यांच्या परतफेडीसाठी पहिला टप्पा असेल तर 2 लाख रुपयांच्या कर्जासाठी 30 महिन्यांच्या परतफेडीसाठी दुसरा टप्पा असेल. तसेच डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देण्यात येईल.
कोण होणार विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी ? Pm vishwakarma
स्वयंरोजगाराच्या आधारावर हात आणि साधनांचा वापर करून काम करणारा आणि योजनेत नमूद केलेल्या 18 कुटुंब-आधारित पारंपारिक व्यवसायांपैकी एक कारागीर किंवा शिल्पकार पीएम विश्वकर्मा अंतर्गत नोंदणीसाठी पात्र असेल. नोंदणी करतेवेळी लाभार्थीचे किमान वय 18 वर्षे असावे.
लाभार्थी नोंदणीच्या वेळी संबंधित व्यापारात गुंतलेला असावा त्याचप्रमाणे त्याने स्वयंरोजगार किंवा व्यवसाय विकासासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या तत्सम क्रेडिट-आधारित योजनांतर्गत गेल्या ५ वर्षात कर्ज घेतलेले नसावे. उदा. PMEGP, PM SVANidhi, मुद्रा
योजनेअंतर्गत नोंदणी आणि लाभ कुटुंबातील एका सदस्यापुरते मर्यादित असतील.
सरकारी सेवेत असलेली व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेंतर्गत पात्र असणार नाहीत.
विश्वकर्मा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
pm vishwakarma या योजनेअंतर्गत शिल्पकार आणि कारागिरांना जे पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येणार आहे तेच या योजनेसाठी आवश्यक आहे.
यासोबतच आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, आयडेंटिटी फोटो, रहिवासी दाखला इत्यादी काही कागदपत्रे आवश्यक आहेत.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
शेतकऱ्यांना साठी योजना
Wooden furniture work and shop..
Wooden furniture work and shop
कारागीर
Good yojna
बारबर्ल
Kay comments karychi kalat nahi
I love my India
Self employment, aneed to do something new , presently works at building construction material supplies.
🙏🕉🚩जय विश्वकर्म🚩🕉🙏
🕉🚩विश्वकर्मा फर्नीचर🚩 🕉