annabhau sathe vikas mahamandal : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; थेट कर्ज योजना २०२३ विषयी माहिती आजच करा अर्ज!

annabhau sathe vikas mahamandal : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; थेट कर्ज योजना २०२३ विषयी माहिती आजच करा अर्ज!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना ११ जुलै १९८५ रोजी झाली आहे. महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांपैकी संख्येने मोठ्या प्रमाणात असलेला मातंग समाज व त्याच्या १२ पोट जाती यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास करून त्यांना दारिद्र्यरेषेच्या वर आणणे हा या महामंडळाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.

महामंडळास विशेष केंद्रीय अर्थसाहाय्य अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून केंद्र शासनाच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार खालील योजना राबवण्यात येतात.

अनुदान योजना

विशेष केंद्रीय अर्थसाहाय्य योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून अनुदान योजना राबविण्यात येते. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाखापर्यंत आहे, अशा कुटुंबातील अर्जदारांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायासाठी बँकेच्या साहाय्याने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. एकूण मंजूर

प्रकल्प रकमेमध्ये ५०% किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपये यापैकी जी कमी असेल ती रक्कम महामंडळामार्फत लाभार्थीस अनुदान म्हणून दिली जाते. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जाच्या रूपात वितरित करण्यात येते.

प्रशिक्षण योजना

विशेष केंद्रीय अर्थसाहाय्य योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या एकूण निधीच्या १०% रक्कम ही प्रशिक्षण योजनेवर खर्च करण्यात येते. मातंग समाजातील इयत्ता चौथीपासून पुढे शिक्षण घेतलेल्या १८ ते ३५ वयोगटातील युवक/युवतींना वाहन चालक, वेल्डिंग, मोटर मॅकनिकल, शिवणकाम, ब्युटीपार्लर, फिटर, रेडीओ / टीव्ही दुरुस्ती, सुतारकाम इ. व्यावसायिक प्रशिक्षण शासन मान्य संस्थांमार्फत दिले जाते. ज्यामुळे युवक/युवतींना स्वयंरोजगार मिळण्यास मदत होते.

राज्य शासनामार्फत महामंडळास भागभांडवली अंशदान निधी प्राप्त होत असतो. या प्राप्त निधीतून खालील योजना राबवण्यात येतात.

बीजभांडवल योजना

प्रकल्प मर्यादा रुपये ५०,००१ ते पर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणांमध्ये रुपये १०,००० अनुदान वगळता उर्वरित कर्जामध्ये ५ टक्के अर्जदाराचा सहभाग आवश्यक आहे. महामंडळातर्फे २० टक्के कर्ज (रुपये १०,००० अनुदानासह ) दिले जाते व उर्वरित ७५ टक्के कर्ज बँकेचे असते. महामंडळाचे कर्ज द.सा.द.शे. ४ टक्के व्याजासह महामंडळाकडे परतफेड करावयाचे असते.

तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळ (एनएसएफडीसी) दिल्ली यांच्याकडून मंजूर होणाऱ्या विविध योजनेंतर्गत सुमारे २०% कर्ज रकमेचा हिस्सा महामंडळाच्या भागभांडवलाच्या निधीतून लाभार्थीस वितरित केला जातो.

थेट कर्ज योजना

थेट कर्ज योजनेची कर्ज मर्यादा २५ हजारावरून १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेमध्ये महामंडळाचे भांगभाडवल निधी ८५ हजार रुपये अनुदान निधी दहा हजार रुपये व लाभार्थीचा सहभाग रक्कम पाच हजार रुपये असे एकूण १ लाख रुपये कर्ज द.सा.द.शे. ४% व्याज दराने लाभार्थीना वितरित करण्यात येते. हे कर्ज लाभार्थीकडून ६० समान हप्त्यांमध्ये वसूल करण्यात येते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना

मातंग समाजातील प्रती वर्षी इयत्ता १० वी १२ वी, पदवी व पदविका व पदव्युत्तर परीक्षेत कमीतकमी ६०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची जिल्हानिहाय प्राप्त गुणाच्या टक्केवारीनुसार निवड केली जाते व उपलब्ध निधीच्या मर्यादेत शिष्यवृत्ती एकदाच पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहनपर दिली जाते. ही योजना मा. मुख्यमंत्री निधीतून महामंडळास मिळालेल्या २० लाख निधीच्या मिळणाऱ्या व्याजातून प्रतिवर्षी राबवण्यात येते. शिष्यवृत्ती – १) १०वी – रुपये १,०००/- २) १२ वी – रुपये १,५००/- ३) पदवी व पदविका रुपये २,०००/- ४) पदव्युत्तर – रुपये २,५००/-

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाच्या योजना

मुदत कर्ज योजना

या योजनेंतर्गत विविध व्यवसायांकरिता एनएसएफडीसीमार्फत ५ लाखांपर्यंत असलेल्या व्यवसायांकरिता मुदत कर्ज मंजूर केले जाते. या कर्ज रकमेमध्ये ७५% हिस्सा हा एनएसएफडीसी महामंडळाचा असतो. २०% हिस्सा महामंडळाचे भागभांडवल निधीतून (दहा हजार रुपये अनुदानासह ) देण्यात येतो. उर्वरित ५% रक्कम ही लाभार्थीची असते. ही कर्जाची परतफेड जास्तीत जास्त ५ वर्ष असते. एनएसएफडीसीच्या रकमेवर द.सा.द.शे. ६% व महामंडळाच्या रकमेवर द.सा.द.शे ४% व्याज आकारण्यात येते.

लघुऋण वित्त योजना

एनएसएफडीसी योजनेंतर्गत लघुऋण वित्त योजना २०००-०१ पासून राबवण्यात येते. या योजनेंतर्गत प्रति लाभार्थी एनएसएफडीसीचे मुदत कर्ज ४० हजार रुपये व महामंडळाचे अनुदान १० हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपयांच्या मर्यादेत लघु उद्योगांमध्ये लाभ देण्यात येतो.

महिला समृद्धी योजना

ही योजना २००४-०५ पासून महामंडळामार्फत राबवण्यात येत आहे. ही योजना एनएसएफडीसीकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून राबवण्यात येते. या योजनेंतर्गत प्रति लाभार्थी एनएसएफडीसीचे मुदत कर्ज ४० हजार रुपये व महामंडळाचे अनुदान १० हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपयांच्या मर्यादेत लाभ देण्यात येतो.

शैक्षणिक कर्ज योजना

मातंग समाजातील युवक-युवतींना एनएसएफडीसी योजनेंतर्गत देशात व परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता एनएसएफडीसीअंतर्गत शैक्षणिक कर्ज योजना राबवण्यात येते. देशांतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २० लाख रुपये व परदेशांतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० लाख रुपये कर्ज मंजूर केलेजाते. या कर्जाची परतफेड शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ६ महिन्यांपासून अथवा नोकरी लागल्यापासून करावयाची असते.

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता आवश्यक पात्रता

  • १. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • २. अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असावे व ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • ३. अर्जदार हा मातंग किंवा तत्सम १२ पोटजातीतील असावा.
  • ४. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव / प्रशिक्षण घेतलेले असावे
  • ५. राज्य शासनाच्या व केंद्रीय महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता शहरी/ ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत असावे.
  • ६. अर्जदाराने इतर कोणत्याही शासकीय योजनांचा किंवा महामंडळाच्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
  • ७. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या शर्ती व अटी अर्जदारावर बंधनकारक राहतील.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळा अंतर्गत योजनेचा लाभ कोणत्या जाती पात्र असतात ?

मातंग,मांग, गारूडी, मदारी, मांग गोराडी, मांग महाशी,मादगी मादीगा,मिनी मादीग,दानखणी मांग,राधे मांग.या सर्व जाती पत्र आहेत.या जातीतील तरुण तरुणी या सर्व योजनेचा लाभ घेवू शकतात.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  • • अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला.)
  • • अर्जदाराच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला (सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला)
  • • महामंडळाच्या योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराच्या बाबतीत नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या तीन प्रती.
  • • अर्जदाराचा शैक्षणिक दाखला.
  • • रेशन कार्ड व आधार कार्डच्या झेरॉक्स प्रती (मोबाईल नंबरसह)
  • • वाहन खरेदी करण्यासाठी वाहन चालवण्याचा परवाना.
  • • ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा
  • •असेल त्या जागेच्या उपलब्धतेचा पुरावा (उदा. भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा)
  • • व्यवसायासंबंधी असलेल्या अनुभवाचा दाखला / तांत्रिक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र • व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल
  • • व्यवसायासाठी खरेदी करावयाच्या मालाचे / साहित्याचे/ वाहनाचे कोटेशन.
  • • प्रतिज्ञापत्र (स्टॅम्प पेपरवर)

अर्ज करण्याची पद्धत              

१. अर्जाचा नमुना सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.

२. विहित नमुन्यातील अर्ज भरून तीन प्रतीत संपूर्ण कागदपत्रांसह संबंधित जिल्हा कार्यालयात जमा करावा.

सदरील योजनाच्या अधिक माहितीसाठी महामंडळाच्या खालील अधिकृत वेबसाइटला भेट देवून खात्री करू शकता https://slasdc.org/loan-process.php

Conclusion:

वरील लेखात आपण पाहिले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे चालू असलेल्या विविध योजनांच्या सविस्तर माहितीचा अभ्यास केला आहे, यामध्ये केंद्रातर्फे राबवल्या जाणाऱ्या अनुदान योजना ज्या की आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबासाठी विविध कर्ज योजना विशेष योजनेअंतर्गत प्रशिक्षण योजना मातंग समाजातील विविध युवक युवतींना उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी राबवून योजना तसेच बीज भांडवल योजना ज्याद्वारे तरुण-तरुणींना बिजनेस स्थापन करण्यासाठी कर्ज प्राप्त होते.

तसेच शिक्षण घेण्यासाठी विविध शिष्यवृत्ती योजना चाही आपण अभ्यास केला आहे महिलांचे प्रगती होण्यासाठी महिला समृद्धी योजना चाहिये लाभ घेऊ शकतात तसेच शिक्षण घेण्यासाठी जर उच्च शिक्षणाचे शैक्षणिक कर्ज योजनाही यामध्ये समाविष्ट आहे,या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय व कागदपत्रे काय लागते याचाही वरील आज आपण अभ्यास केलेला आहे, याव्यतिरिक्त आपणास कुठल्या शंका असेल तर आम्हास कमेंट द्वारे नक्की सांगा.

हे ही वाचा : पीएम विश्वकर्मा योजना, प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवाराला ५०० रुपये प्रतिदिन.

3 thoughts on “annabhau sathe vikas mahamandal : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; थेट कर्ज योजना २०२३ विषयी माहिती आजच करा अर्ज!”

  1. Mi ..Devanshu Santape .at. Thathatirwad .T. Narkhad .G. Nagapur. Mi mang samjatil mulga asun mala karjachi atntya garh ahe . Mazhi hi vinnti Manya karavi .🙏🙏

    Reply

Leave a Comment