toyota hyryder 2024: 40 च ऍव्हरेज देणारी टोयोटाची नवीन कार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

toyota urban cruiser hyryder 2024 : भारतीय बाजारात अनेक कंपन्या पेट्रोल डिझेल तसेच इलेक्ट्रिक गाड्या  विकतात. त्यातच आता पेट्रोल अणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याने कार कंपन्या आपल्या नवीन गाड्यांमधे नवीन फीचर्स आणत असतात.

त्यातच आता सीएनजी आणि इलेक्ट्रिक नंतर हायब्रिडचा जमाना सुरू होताना दिसतोय. त्यातच टोयोटा कंपनीने Urban Cruiser Hyryder स्ट्राँग हायब्रिड hyryder car कार बाजारात लाँच केली आहे.

toyota hyryder 2024 features

ह्यामध्ये कोणते नवीन फीचर्स आहेत ते जाणून घेऊया

टोयोटा कंपनीच्या Urban Cruiser Hyryder स्ट्राँग हायब्रिड कार मध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्ट असलेला ९ इंचचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड लेदर सीट्स, 360-डिग्री कॅमेरा तसेच वॉयस कमांड आणि प्रीमियम स्विच सोबतच एक सॉफ्ट टच इंस्ट्रूमेंट पैनल देण्यात आलं आहे. एंबिएंट लाइटिंग, ड्राइव मोड स्विच, डोर स्पॉट+आईपी लाइन, हेड-अप डिस्प्ले, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग सोबतच भारतातील ही पहिली कार आहे ज्यामधे पॅनोरॅमिक सनरूफ आहे. त्याचप्रमाणे टोयोटा कंपनीने फीचर्स मधे कोणत्याही प्रकारची कसर सोडलेली नाही.

toyota hyryder 2024 engine  इंजिन व त्याचे कार्य

टोयोटाच्या या नवीन गाडीमधे १.५ लीटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहेत आणि त्यासोबत १७७.६ व्होल्ट लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे जो ११४ bhp ची पॉवर आणि १२२ Nm टॉर्क जनरेट करतो. त्याचप्रमाणे मॅन्युअलसोबतच यामध्ये ECVT ट्रान्समिशनचा पर्यायही देण्यात आला आहे. निओ ड्राइव्ह आणि स्व-चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह सुसज्ज Urban Cruiser Hyryder मधे प्रचंड प्रमाणात इंधन कार्यक्षमता आहे. कंपनी कडून जेव्हा ड्राइव रिव्यू करण्यात आला तेव्हा Urban Cruiser Hyryder पर्यायामध्ये २७.९७ किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देते असा दावा कंपनीने केला आहे.

Toyota Hyryder Price

S eDrive 2WD हायब्रिड : १५.११ लाख रुपये

V AT 2WD Neo ड्राईव्ह : १७.०९ लाख रुपये

G eDrive 2WD हायब्रिड : १७.४९ लाख रुपये

V eDrive 2WD हायब्रिड : १८.९९ लाख रुपये

toyota hyryder 7 seater 2024 design

डिझाईन कशाप्रकारे करण्यात आले आहे.

टोयोटा कंपनीची Urban Cruiser Hyryder ही गाडी एक मोठी आरामदायी 5 सीटर SUV आहे. ह्या गाडीची लांबी ४.३६ मीटर, रुंदी १.७९ मीटर तर उंची १.६३ मीटर इतकी आहे. एसयूव्हीचा व्हीलबेस २.६ मीटर आहे. १२७५ किलो वजनाच्या या हायब्रिड एसयूव्हीमध्ये ४५ लिटरची इंधन टाकी आहे. Urban Cruiser Hyryder गाडीच्या लुक्स आणि डिझाईन बद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, twin LED DRL, ड्युअल टोन बॉडी कलर, क्रोम गार्निशसह युनिक क्रिस्टल ऍक्रेलिक अप्पर ग्रिल आणि 17-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

Conclusion:

तुम्ही सुद्धा हायब्रिड गाडी घ्यायचा विचार करत असाल तर टोयोटाची hyryder toyota  तुमच्यासाठी चांगल्या फीचर्ससह एक उत्तम गाडी आहे.