lek ladki yojana 2024: लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार ;असा करा अर्ज !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

lek ladki yojana:लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती;असा करा अर्ज !

lek ladki yojana :प्रत्येक आई वडिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे लेक, आता ह्याच महाराष्ट्रातील लेकींसाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना चालू केली आहे. केंद्र सरकारने देशात विविध प्रकारच्या योजना राबविल्या आहेत व अजूनही अनेक प्रकारच्या योजना राबवत आहेत. तसेच आत्तापर्यंत केंद्र सरकारने मुलींसाठी हि अनेक योजना चालविल्या आहेत. ज्या मध्ये सुकन्या समृद्धी योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, बालिका समृद्धी योजना या प्रकारच्या योजनांचा या मध्ये समावेश आहे.

महाराष्ट्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात एक नवीन योजना जाहीर करण्यात आली होती ती म्हणजे लेक लाडकी योजना. उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडनवीस यांनी अर्थ संकल्पीय भाषणात लेक लाडकी योजनेची घोषणा केली होती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला.

राज्यातील मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लेक लाडकी योजना असे या नव्या योजनेचे नाव असून या योजनेअंतर्गत मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. 

योजनेचे नाव लेक लाडकी योजना
राज्यमहाराष्ट्र
सुरू कधी झालीOct 2023
लाभ कोणालापिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक
एकूण लाभ1 लाख 1 हजर रुपये
अर्ज कसा करावाऑनलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://womenchild.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर70784 84055

महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना या योजनेचा भाग बनवण्यात येणार आहे कारण आर्थिक अडचणींमुळे अनेक मुली शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना कुठेही रोजगाराच्या संधि मिळत नाहीत.

लेक लाडकी योजना सुरू झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती नसलेल्या मुलींना आता पुढील शिक्षण सुरू ठेवता येणार आहे.यासाठी त्यांना एकूण 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात सद्यःस्थितीत  माझी कन्या भाग्यश्री ही योजना १ ऑगस्ट २०१७ पासून राबविण्यात येत होती.

या योजनेत दरवर्षी सुमारे ५००० लाभार्थी पात्र ठरत होते व त्याकरिता वार्षिक खर्च सुमारे १२ कोटी रुपये एवढा येत होता.आता ही योजना बंद होणार असून नव्या स्वरूपात लेक लाडकी योजना राबविण्यात येणार आहे. मार्च २०२३ च्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेनुसार राज्य सरकारनं महाराष्ट्रात लेक लाडकी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना अठरा वर्षापर्यंत लाख हजार रुपये निधी दिला जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या या योजनेत आणखी कोणते फायदे होतील? कश्याप्रकारे तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता? लेक लाडकी योजना online form याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत ती माहिती अत्यंत महत्वाची असणार आहे.

लेक लाडकी योजनेचा उद्देश काय आहे?

  • लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हे लेक लाडकी योजनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • महाराष्ट्रातील गरीब मुलींना आपले शिक्षण चालू ठेवता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने ही लेक लाडकी योजना सुरू केली आहे.
  • यासोबतच त्याच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा भार पडू नये कारण अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांचे उत्पन्न कमी आहे ज्यामुळे ते आपल्या मुलींना शिक्षण देऊ शकत नाहीत आणि त्यामुळेच त्यांच्या मुली अशिक्षित राहतात.
  • त्यानंतर त्यांना कोणतेही नोकरीची संधि  मिळत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्यातील सर्व मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

लेक लाडकी योजनेसाठी लागणारी पात्रता काय आहे?

  • १) या योजनेसाठी तुम्ही मूळ महाराष्ट्राचे असणे अनिवार्य आहे. तरच तुम्हाला यासाठी पात्र असणार आहेत.
  • २) लेक लाडकी या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक अर्जदाराकडे शिक्षणाशी संबंधित कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.
  • ३) महाराष्ट्र लेक लाडकी या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठराल.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत

  • महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी आधार कार्ड असणे बंधनकारक आहे जेणेकरून अर्जदाराची अचूक माहिती शासनाकडे राहील.
  • तसेच जन्म दाखलाही द्यावा लागतो याद्वारे सरकारला तुमच्या जन्माची अचूक माहिती सहजरित्या मिळू शकते.
  • तुम्हाला शिक्षणाशी संबंधित माहिती देखील यामध्ये समाविष्ट करावी लागेल याद्वारे तुम्हाला शिक्षणाच्या आधारावर फायदे दिले जातील.
  • या योजनेसाठी रहिवाशी प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे रहिवाशी प्रमाणपत्र हे सिद्ध करते की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो देखील आवश्यक आहेत यामुळे अर्जदाराची ओळख पटवणे अधिक सोपे होईल.
  • तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देखील द्यावा लागेल जेणेकरून तुम्हाला योजनेची योग्य माहिती सहज मिळू शकेल.

लेक लाडकी योजनेचे लाभ पुढील प्रमाणे

१) ही लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे त्यामुळे महाराष्ट्रामधील मुलींना त्याचा लाभ मिळणार आहे.

२) महाराष्ट्र लेक लाडकी योजनेत शासनाने वेगवेगळी रक्कम निश्चित केली असून त्यानुसार त्याचा लाभ मिळणार आहे.

३) तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

४) या योजनेअंतर्गत ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे व ज्यांच्याकडे पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका (रेशन कार्ड) आहेत अशा कुटुंबांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

५) या योजनेमध्ये दारिद्ररेषेखालील किंवा त्या खालील प्रवर्गातील मुलींना लाभ देण्याची तरतूद केली जाणार आहे.

६) या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर कुटुंबाला 5 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

७) मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे तीन हजार रुपये मदत दिली जाणार आहे.

८) तुमची मुलगी शाळेत पहिली मध्ये गेल्यावर तिला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

 ९) मुलगी सहावीत गेलीनंतर या योजनेंतर्गत तिला 7 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

१०) त्या नंतर मुलगी अकरावीत गेली असता तिला शासनाकडून 8 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

 ११) तुमची मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिच्या पुढील शिक्षणासाठी सुमारे 75 हजार रुपयांची उर्वरित आर्थिक मदत सरकारकडून दिली जाईल.

म्हणजे मुलगी जन्मापासून 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत तिला लेक लाडकी योजने अंतर्गत एकूण 1 लाख 1 हजार एवढी मदत मिळणार आहे.

१२) या योजनेअंतर्गत दोन अपत्य असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी ही लेक लाडकी लखपति योजना आहे. जर एखाद्या कुटुंबात पहिला मुलगा असेल आणि नंतर दोन जुळ्या मुली झाल्या असतील तरीसुद्धा त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येईल.

१३) १ एप्रिल २०२३ पासून जन्माला आलेल्या सर्व मुलींचा या योजनेत समावेश होणार आहे.

१४) १ एप्रिल २०२३ च्या आधी १ मुलगी किंवा मुलगा असेल आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

१५) तसेच १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.

१६) त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.

या योजनेमुळे पालकांच्या डोक्यावरील मुलींच्या शिक्षणाचा भार तसेच त्यांच्या पालनपोषणाचा भार कमी होणार आहे त्यामुळे मुलगी ही आता जड वाटणार नसल्यानं मुलींचा मृत्यूदर निश्चितच कमी होईल.

लेक लाडकी योजना अधिकृत वेबसाइट

लेक लाडकी योजना 2023 योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत https://womenchild.maharashtra.gov.in/ ला भेट देवू शकता

लेक लाडकी योजना online form प्रक्रिया कश्याप्रकारे असेल?

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा असा प्रश्न पडला असेल तर लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवणीसाठी खालील साइटला भेट देवून अर्ज करू शकता

अधिकृत वेब साईट: https://womenchild.maharashtra.gov.in/

लेक लाडकी योजना फॉर्म pdf

लेक लाडकी योजना 2023 फार्म वरील अधिकृत साईट वर जावून पाहू शकता येथे लेक लाडकी योजना फॉर्म मराठी मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.

हे ही वाचा :Female farmers in india

FAQ

लेक लाडकी योजना 2023 काय आहे ?

लेक लाडकी 2023 योजना असि योजना आहे की यातून मुलीना लखपति करणारी योजना आहे

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा ?

लेक लाडकी योजनेचा अर्ज वरील लेखात कोठे करायचा हे दिले आहे

लेक लाडकी योजना कागदपत्रे कोणती ?

वरील लेखात सर्व कागद पत्रे सविस्तर दिली आहेत

लेक लाडकी योजना online apply करू शकतो का ?

हो या योजनेचा लाभ घेणयसाठी online apply करू शकता

2 thoughts on “lek ladki yojana 2024: लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार ;असा करा अर्ज !”

Leave a Comment