weather news: राज्यात सर्व भागात सध्या ऊन खूप वाढले आहे, त्यामुळे खूप गॅरी वाढली आहे. तसेच सध्या बरीच भागात शेतकरी बांधवांची हरभरा तसेच गहू काढणी सुरु आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हा हवामान अंदाज महत्वच आहे.
हवामान विभाग तसेच हवामान तज्ञांतर्फे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आणि आपल्याला माहित आहे जरी अवकाळी पावसामुळे वातावरणात थंडावा येत असेल परंतु यातून ज्या शेतकरी बांधवानी गहू काढला न्हाई हरभरा काढला नाही त्याचे या पावसामुळे नुकसान होऊ शकते.
राज्य मध्ये मार्च च्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचे ढग विखुरलेले स्वरूपात पाहायला मिळतील.
विशेष करून विदर्भ व मराठवाड्यात या अवकाळी पावसाची शक्यता आहे. हा अवकाळी पाऊस संपूर्ण मराठवाडा किंवा संपूर्ण विदर्भ मध्ये पडणार नसून हा पाऊस या भागातील जिल्ह्यामध्ये पण विखुरलेल्या स्वरूपात म्हणजे कुठं कुठे भाग बदलून पडेल, म्हंजे याचा अर्थ हा पाऊस सर्वदूर नसणार आहे.
कोकण पट्टी मध्ये पण सर्वदूर नाही पण काही भागात या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात परभणी, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, संभाजीनगर या भागात ३०,३१ मार्च व १ एप्रिल या दरम्यान अवकाळी तोही माध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे.
पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ या भागात थोडा जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. या भागातील कांडा काढण्यास आलेल्या शेतकरी बांधवानी कांदा काढून घ्यायचा आहे.
राज्यात हा पाऊस सर्व जिल्ह्यात पडणार नाही पण हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असणार आहे सर्वानी लक्षात घ्याचा आहे. तसेच शेतकरी बांधवानी हे लक्षात घ्या परत एकदा एप्रिल मध्ये ६,७,८ तारखेला परत पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण हा पाऊस थोडा जास्त स्वरूपाचा असणार आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.