Upcoming IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी मालकीची इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (IIFCL) IPO लाँच करण्याची योजना आखत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीचे एमडी पीआर जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आर्थिक वर्षात आयपीओद्वारे सूचीबद्ध होण्याची योजना तयार केली जात आहे.
कंपनीचे एमडी म्हणतात…
“आम्ही सूचीची तयारी करत आहोत. पुढील आर्थिक वर्षात ते होण्याची शक्यता आहे.” आयआयएफसीएलच्या स्थापना दिनानिमित्त पीआर जयशंकर यांनी ही माहिती दिली. कंपनी लवकरच सल्लामसलत प्रक्रिया सुरू करणार असून सरकारकडून विविध परवानग्या आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. आयपीओच्या माध्यमातून किती शेअर्सची विक्री करण्याचे नियोजन आहे, या प्रश्नावर पीआर जयशंकर म्हणाले की, सविस्तर चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल. सध्या IIFCL 100 टक्के भारत सरकारच्या मालकीची आहे.
1500 कोटींचे निव्वळ उत्पन्न मिळणार!
आयआयएफएलचे एमडी पीआर जयशंकर यांना विश्वास आहे की कंपनीचे निव्वळ उत्पन्न आर्थिक वर्ष 2024 मध्ये रु. 1,500 कोटी पार करेल. आर्थिक वर्ष 2023 मध्ये नफा दुपटीने रु. 1076 कोटी इतका वाढला होता. स्थापनेपासून, कंपनीने 750 पायाभूत सुविधा प्रकल्पांना 2.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. कंपनीने डिसेंबर 2023 पर्यंत 30,315 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतची मागणी पाहता, मार्च २०२४ पर्यंत कर्ज मंजूरी ४०,००० कोटी रुपयांच्या पुढे जाईल.
कंपनीचे ग्रॉस एनपीए आणि निव्वळ एनपीए गुणोत्तर सतत घसरत आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजी तो 3.77 टक्के, 0.85 टक्के होता. पुढील वर्षीच्या नफ्याबद्दल विचारले असता जयशंकर म्हणाले की कंपनीचे लक्ष्य 2,000 कोटी रुपये आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
नाहीतर एलआयसीचा सरकारी आयपीओ आला होता त्यासारखं नाही झालं पाहिजे भावा