Union Budget 2024: अर्थसंकल्प 2024 सादर; पहा काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Union Budget 2024-25) सादर केला आहे. यावेळी त्यांनी अनेक उत्पादने आणि सेवांवरील करांमध्ये बदल जाहीर केले आहेत. करात कपात केल्यामुळे अनेक उत्पादने आता स्वस्त होणार आहेत, तर कर वाढीमुळे काही उत्पादनांच्या किमती वाढणार आहेत.

नोकरीची संधी ! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि.
1021 पदांसाठी भरती, पगार 30 ते 88 हजार
👆 माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆

काय झाले स्वस्त?

सोने आणि चांदी:

अर्थसंकल्पातील बदलांमुळे सोने आणि चांदी स्वस्त होणार आहेत. सरकारने या मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्युटी 6 टक्के केली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत लक्षणीय घट होईल, ज्यामुळे दागिन्यांच्या बाजारातही याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.

प्लॅटिनम:

प्लॅटिनमवरही कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. यामुळे प्लॅटिनमचे दागिने आणि इतर वस्तू आता स्वस्त मिळतील. याचा फायदा लग्नसमारंभांसाठी प्लॅटिनमचे दागिने खरेदी करणाऱ्यांना होणार आहे.

कर्करोग औषधे:

कर्करोगाच्या औषधांच्या किमती कमी केल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे कर्करोगावर उपचार घेणाऱ्यांना औषधांचा खर्च कमी होईल आणि उपचार सुलभ होतील.

खजूर की खेती : बंजर जमीन पर भी सोना;
10 पेड़ों से 5 लाख की कमाई,
छोटी खेती से बदलें किस्मत !
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆

मोबाइल चार्जर:

मोबाइल चार्जरसह इतर उपकरणांवरील BCD 15% ने कमी केल्यामुळे मोबाइल चार्जरच्या किमतीत घट होईल. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना फायदा होणार आहे.

चामड्याच्या वस्तू:

लेदर आणि फुटवेअरवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याने चामड्याच्या वस्तू स्वस्त होतील. यामुळे लेदरच्या वस्तू वापरणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

बजेट सादर होण्यापूर्वीच खाद्य तेल झाले स्वस्त;
पहा 15 लिटर व 7 लिटर डब्याचे नवीन दर!
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆

काय झाले महाग?

अमोनियम नायट्रेट:

स्फोटक बनवण्यासाठी वापरले जाणारे अमोनियम नायट्रेट अधिक महागणार आहे. यामुळे स्फोटकांच्या उत्पादनाचा खर्च वाढणार असून, संबंधित उद्योगांवर त्याचा परिणाम होईल.

फ्लेक्स किंवा बॅनर:

राजकीय आणि व्यावसायिक जाहिरातींसाठी वापरल्या जाणाऱ्या फ्लेक्स किंवा बॅनरवरील कस्टम ड्युटी 10% वरून 25% करण्यात आली आहे. यामुळे या वस्तू महाग होणार आहेत, ज्याचा परिणाम जाहिरात कंपन्या आणि व्यवसायांवर होईल.

WHATSAPP GROUP LINK

Leave a Comment