Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प ( Union Budget 2024-25 ) सादर केला आहे. यावेळी त्यांनी अनेक उत्पादने आणि सेवांवरील करांमध्ये बदल जाहीर केले आहेत. करात कपात केल्यामुळे अनेक उत्पादने आता स्वस्त होणार आहेत, तर करवाढीमुळे काही उत्पादनांच्या किमती वाढणार आहेत.
काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार?
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील बदल
गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये टीव्ही, स्मार्टफोन, कॉम्प्रेस्ड गॅस आणि प्रयोगशाळेतील हिरे यासारख्या वस्तूंच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. तर सिगारेट, विमान प्रवास आणि कापडाच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या महाग झाल्या आहेत ते पाहू या.
काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार?
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆
स्वस्त झालेल्या वस्तू आणि सेवांची यादी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरची औषधे स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. मोबाईल आणि मोबाईल चार्जरसह इतर उपकरणांवरील BCD 15% ने कमी करण्यात आले आहे. याशिवाय, सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्के केली आहे, ज्यामुळे सोन्या-चांदीच्या किमती कमी होतील. लेदर आणि फुटवेअरवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.
काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार?
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆
महाग झालेल्या वस्तू आणि सेवांची यादी
दूरसंचार उपकरणे महाग झाली आहेत, त्यावरील कस्टम ड्युटी 15% करण्यात आली आहे. स्फोटक बनवण्यासाठी वापरले जाणारे अमोनियम नायट्रेट अधिक महागणार आहे. तसेच, राजकीय आणि व्यावसायिक जाहिरातींसाठी वापरल्या जाणाऱ्या फ्लेक्स किंवा बॅनरवरील कस्टम ड्युटी 10% वरून 25% पर्यंत वाढवण्यात आली आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.