महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामात राज्यात दरवर्षी सोयाबीन आणि कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याशिवाय तुरीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. गेल्यावर्षी तुरीला चांगला भावही मिळाला आहे. त्यामुळे यंदा तूर लागवडीखालील क्षेत्र आणखी वाढणार असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत आज आपण तुरीचे अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप तीन जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोयबीनच्या या वाणांची पेरणी करा आणि मिळवा एकरी
खरे तर, कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन जर मिळवायचे असेल तर त्याच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण तुरीच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात तूर लागवड करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे.
या नवीन तूर वाणाची करा लागवड, उतार येईल डब्बल
तुरीच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
1. पीकेव्ही तारा
तुरीची ही एक सुधारित जात असून राज्यातील अनेक भागांमध्ये पिकवली जाते. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे. या जातीचे पीक 170 ते 180 दिवसात परिपक्व होते. या जातीच्या तुरीचा रंग हा तांबडा असतो. तांबड्या रंगाच्या या तुरीच्या जातीपासून हेक्टरी 19 ते 22 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा केला जात आहे. पीकेव्ही तारा या जातीची खासियत म्हणजे तिची रोग प्रतिकारकता आणि उत्कृष्ट उत्पादनक्षमता. तसेच, या जातीच्या तुरीची मागणी बाजारात जास्त असते, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो.
24 ते 30 तासात मान्सून राज्यात दाखल होणार ; पंजाब डख !
2. फुले राजेश्वरी
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले राजेश्वरी ही तुरीची एक सुधारित जात असून या जातीचे पीक अवघ्या 140 ते 150 दिवसात परिपक्व होत असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. या जातीपासून कमी दिवसात चांगले उत्पादन मिळते. हेक्टरी 18 ते 23 क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या जातीची आहे. त्यामुळे जर तुमचाही खरीप हंगाम 2024 मध्ये तूर लागवडीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी या जातीचे पीक फायदेशीर ठरणार आहे. फुले राजेश्वरीची विशेषता म्हणजे ती जलद परिपक्व होते आणि तिची रोग प्रतिकारकता चांगली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी जोखमीचे उत्पादन मिळते.
पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता
3. बी डी एन – ७१६
तुरीची ही एक सुधारित जात असून राज्यातील हवामान या जातीसाठी विशेष पूरक आहे. या जातीचे पिक १६५-१७० दिवसात परिपक्व होत असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीपासून हेक्टरी 20 ते 22 क्विंटल पर्यंतचे दर्जेदार उत्पादन मिळू शकते. ही जात मर व वांझ रोगास प्रतिकारक असल्याचे सांगितले जात आहे. बी डी एन – ७१६ या जातीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती विविध हवामानात चांगले उत्पादन देते, ज्यामुळे ती महाराष्ट्रातील विविध भागात लोकप्रिय आहे.
तुरीची लागवड आणि खत व्यवस्थापन
तुरीच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य लागवड तंत्रज्ञान आणि खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. तुरीसाठी शेतात ६० x ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी. जमीन तयार करताना शेणखत, कंपोस्ट, किंवा हिरवळीचे खत वापरावे. नत्र, स्फुरद, आणि पालाश यांचा योग्य प्रमाणात वापर करून खत व्यवस्थापन करावे.
पाणी व्यवस्थापन
तुरीला पाणी कमी लागते परंतु पीक लहान असताना पाण्याची गरज असते. पाण्याची योग्य व्यवस्थापन केल्यास पीक चांगले वाढते. तुरीसाठी ठिबक सिंचन पद्धत उपयुक्त ठरते, ज्यामुळे पाणी बचत होते आणि पीक चांगले वाढते.
कीड आणि रोग व्यवस्थापन
तुरीवर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी जैविक पद्धतीने कीड आणि रोग व्यवस्थापन करावे. कीटकनाशकांचा वापर करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी तज्ञांची सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
निष्कर्ष
तुरीचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य वाणांची निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि कीड-रोग व्यवस्थापन यांचे योग्य प्रमाणात पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. पीकेव्ही तारा, फुले राजेश्वरी, आणि बी डी एन – ७१६ या तुरीच्या जाती शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. म्हणून या हंगामात तूर लागवड करताना या जातींची निवड करून शेतकऱ्यांनी आपले उत्पादन वाढवावे आणि अधिक नफा मिळवावा.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.