agriculture news: राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अंदाजानुसार आज बाजारात सुमारे 10 हजार क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे. पणन मंडळाच्या म्हणण्यानुसार, आज टोमॅटोच्या सरासरी भावात वाढ झाली असून तो 900 ते 2500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत उपलब्ध आहे. या वाढीमागे स्थानिक टोमॅटोची आवक आणि सर्वसामान्य जातींच्या दरात झालेली वाढ असल्याचे मानले जात आहे.
पणन मंडळाच्या माहितीनुसार, आज 27 मार्च रोजी सुमारे 8036 क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे. यामध्ये सामान्य, स्थानिक, संकरित, वैशाली आणि टोमॅटोच्या प्रथम क्रमांकाचा समावेश आहे. पुणे बाजार समितीत आज सर्वाधिक 2157 क्विंटल स्थानिक टोमॅटोची आवक झाली आहे, तर मुंबई बाजार समितीतही मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झाली आहे.
टोमॅटोचा आजचा सरासरी भाव 700 ते 2500 रुपयांपर्यंत आहे. पाटण बाजार समितीत टोमॅटोला सर्वाधिक २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. संकरित जातीचे टोमॅटो 700 ते 1300 रुपये प्रति क्विंटल, तर स्थानिक जातीच्या टोमॅटोचा भाव 800 ते 1600 रुपये प्रति क्विंटल आहे. नागपूर बाजार समितीत सर्वाधिक 1600 रुपये प्रतिक्विंटल दराची नोंद झाली आहे. याशिवाय पहिल्या क्रमांकाच्या टोमॅटोला १४०० रुपये प्रतिक्विंटल, तर वैशाली जातीच्या टोमॅटोचा भाव ८०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल आहे.
यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे परत एकदा टोमॅटो चे भाव वाढण्याची शक्यता आहे. असे तज्ज्ञांचे मत आहे.
tomato rate today प्रमुख बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव
कोल्हापूर 1200
अहमदनगर 2500
पुणे-मांजरी 1100
छत्रपती संभाजीनगर 1300
खेड-चाकण 1200
मंचर 2200
श्रीरामपूर 1500 1
सातारा 600
राहता 1500
हिंगणा 1400
कळमेश्वर 1500
अकलुज 1000
पुणे लोकल 1400
पुणे- खडकी 1200
पुणे -पिंपरी लोकल 1400
पुणे-मोशी लोकल 1000
नागपूर लोकल 1500
वडगाव पेठ 1500
पेन लोकल 1600
वाई लोकल 800
मंगळवेढा 1000
कामठी 1500
मुंबई नं. १ 1400
रत्नागिरी1600 1300
सोलापूर 1000
जळगाव 1000
नागपूर 1500
भुसावळ 1500
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.