tomato rate: राज्यात टोमॅटोची आवक वाढली; पहा आजचा भाव!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

tomato rate: राज्यातील विविध बाजारसमित्यांमध्ये आज टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. एकूण ७८६१ क्विंटल टोमॅटोची आवक झाली असून, त्यात हायब्रिड, लोकल, नं.१, आणि वैशाली या टोमॅटोच्या वाणांचा समावेश आहे.

या पाच बँक देत आहेत, स्वस्त होम लोन;
येथे क्लिक करा व पहा माहिती !

पुणे बाजारात आज सर्वाधिक १६३८ क्विंटल लोकल टोमॅटोची आवक झाली आहे, तर पुणे-पिंपरी बाजारात केवळ १० क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे. हायब्रिड वाणांच्या टोमॅटोची आवक कळमेश्वर येथे १५ क्विंटल आणि रामटेक येथे ४० क्विंटल होती.

नं.१ टोमॅटोची सर्वाधिक आवक पनवेल ६६१ क्विंटल आणि मुंबई २१५८ क्विंटल इतकी होती. वैशाली टोमॅटोची आवक सोलापूर २९३ क्विंटल, जळगाव ११५ क्विंटल, नागपुर ५०० क्विंटल, कराड ५४ क्विंटल आणि भुसावळ येथे १५ क्विंटल होती.

Honda ने लॉन्च केली नवीन Unicorn 160 बाइक – बाहुबली इंजिनसह, कडक किंमत ! पहा

टोमॅटोच्या दरांचा विचार केल्यास, लोकल टोमॅटोला पुण्यात २००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. हायब्रिड टोमॅटोला रामटेक येथे २२०० रुपये, नं. १ टोमॅटोला मुंबई येथे २५०० रुपये, तर वैशाली टोमॅटोला नागपुर येथे ४७५० रुपये दर मिळाला.

Leave a Comment