Thibak sinchan yojana 2024
thibak sinchan yojana 2024 महाराष्ट्र ठिबक व तुषार सिंचन योजना अर्ज 2024
शेतकरी मित्रांनो, Thibak sinchan yoajana 2024 महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून प्रधानमंत्री ठिबक व तुषार सिंचन योजना सुरू केली आहे. यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 45% अनुदान दिले जाते. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. खालील माहिती वाचून या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे याबद्दल जाणून घ्या.
ठिबक व तुषार सिंचन योजना अनुदान thibak sinchan yojana Subsidy
ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान दोन प्रकारांमध्ये दिले जाते:
1. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी: ज्यांच्याकडे थोडी जमीन आहे, त्यांना 55% अनुदान मिळते. उदाहरणार्थ, 10,000 रुपयांचे ठिबक व तुषार सिंचन खरेदी केल्यास, 5,500 रुपये अनुदान मिळेल.
2. इतर शेतकरी: उर्वरित शेतकऱ्यांना 45% अनुदान दिले जाते. त्यामुळे सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ठिबक व तुषार सिंचन योजना पात्रता thibak sinchan yojana eligibility
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता:
– आधार कार्ड: शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
– सातबारा उतारा 8अ: डिजिटल सातबारा उतारा असावा.
– जात प्रमाणपत्र: जात प्रमाणपत्र आवश्यक आहे (कास्ट मधून अर्ज करत असल्यास).
– जमिनीचे क्षेत्र: पाच हेक्टरपेक्षा कमी असावे.
– पाण्याचा साठा: शेतात बोरवेल, विहीर, शेततळे किंवा इतर पाण्याचा साठा असायला हवा. नोंद सातबाऱ्यावर असावी. नसेल तर तलाठी कार्यालयामध्ये जाऊन नोंदणी करावी.
ठिबक व तुषार सिंचन योजना अर्ज प्रक्रिया thibak sinchan yojana online apply
1. महाराष्ट्र सरकारच्या [mahadbtपोर्टल](https://mahadbt.maharashtra.gov.in/) वर जा.
2. मोबाईलवर Google Chrome मध्ये महाडीबीटी पोर्टल सर्च करा.
3. संकेतस्थळावर आधार कार्डच्या मदतीने नवीन रजिस्ट्रेशन करा. (रजिस्ट्रेशन कसे करायचे याबद्दल YouTube व्हिडिओ पाहू शकता).
4. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा.
5. लॉगिन केल्यानंतर ‘अर्ज करा’ वर क्लिक करा.
6. ‘कृषी यांत्रिकीकरण’, ‘सिंचन साधने व सुविधा’, ‘फलोत्पादक’ यामधील ‘सिंचन साधने व सुविधा’ निवडा.
7. संपूर्ण माहिती भरून ‘सिंचन साधने व सुविधा’ आणि ‘ठिबक सिंचन’ पर्याय निवडा.
8. पिकांमधील अंतर निवडा आणि आवश्यक माहिती भरा.
अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा अडचणी आल्यास कृषी कार्यालयात जाऊन माहिती घेऊ शकता किंवा YouTube व्हिडिओ पाहून अर्ज भरू शकता.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.