term insurance: आजच्या काळात लोकांना टर्म इन्शुरन्स किंवा लाइफ इन्शुरन्सबद्दल खूप जास्त माहिती नाही. मात्र, कुटुंबातील लोकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी हे खूप महत्वाचे आहे. जाणून घ्या काय आहे टर्म इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स आणि तुमच्यासाठी कोणता इन्शुरन्स अधिक फायदेशीर आहे.
CIBIL Score from 300 to 750 ”तुमचा CIBIL असा वाढवा;
येथे क्लिक करा व चेक करा तुमचा सिबिल स्कोर
आजच्या काळात इन्शुरन्स प्लान गरज बनले आहेत. कोविड काळाने हे सर्वांना चांगलेच समजले आहे. पण तरीही अनेक लोक इन्शुरन्स प्लानला फाजील खर्च मानतात. कोरोना काळानंतर अनेक लोक हेल्थ इन्शुरन्सबद्दल जरी सजग झाले असले तरी टर्म इन्शुरन्स किंवा लाइफ इन्शुरन्सबद्दल फारसे सजग नाहीत. मात्र कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी हेही तितकेच गरजेचे आहे. चला जाणून घेऊया काय आहे टर्म इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स, आणि तुमच्यासाठी कोणता इन्शुरन्स अधिक फायदेशीर आहे.
काय आहे टर्म इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स? Term Insurance & Life Insurance
टर्म इन्शुरन्स Term Insurance एक अशी बीमा पॉलिसी आहे जी निश्चित कालावधीसाठी निश्चित पेमेंट दरावर कव्हरेज देते. अशा स्थितीत बीमित व्यक्तीचे निधन पॉलिसीच्या कालावधी दरम्यान झाल्यास कव्हरची रक्कम नामांकित व्यक्तीला एकरकमी दिली जाते. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते. मात्र, टर्म इन्शुरन्समध्ये मॅच्युरिटी रिटर्न मिळत नाही.
सोन्याच्या भावात वर्षातला मोठा बदल
एका क्लिकवर पहा सर्व जिल्ह्यातले सोन्याचे भाव !
येथे क्लिक करा पहा
लाइफ इन्शुरन्स Life Insurance पॉलिसी संपूर्ण जीवन कव्हरेज देते. यामध्ये इंश्योर्ड व्यक्तीच्या मृत्यूच्या स्थितीत इन्शुरन्स कंपनीकडून त्याच्या नामांकित व्यक्तीला आर्थिक मदत म्हणून मॅच्युरिटी बेनेफिट्स, सरेंडर बेनेफिट्स, लॉयल्टी अॅडिशन वगैरे मिळतात.
टर्म इन्शुरन्स किंवा लाइफ इन्शुरन्स, कोणता अधिक फायदेशीर?Term Insurance Vs Life Insurance
तुम्हाला लाइफ इन्शुरन्स घ्यावे की टर्म इन्शुरन्स Term Insurance , हे तुमच्या गरजांवर अवलंबून आहे. लाइफ इन्शुरन्सच्या तुलनेत टर्म इन्शुरन्स स्वस्त असते. जर तुम्हाला कमी कालावधीसाठी इन्शुरन्स प्लान घ्यायचा असेल तर टर्म इन्शुरन्स फायदेशीर ठरू शकते. टर्म इन्शुरन्स प्लान तुम्हाला कमी पैशांत जास्तीत जास्त कव्हरेज देतो. त्यामुळे तुम्ही पैशांची बचत करू शकता. परंतु, लक्षात ठेवा की टर्म इन्शुरन्स प्लानमध्ये जर व्यक्ती प्रीमियमचे पेमेंट मध्येच थांबवते तर त्याला बेनेफिट्स मिळणे बंद होतात आणि पॉलिसीही बंद होते.
Home Loan या पाच बँक देत आहेत, स्वस्त होम लोन; पहा माहिती !
येथे क्लिक करा पहा
जर तुम्हाला जीवनभरासाठी कव्हरेज पाहिजे असेल तर तुम्ही लाइफ इन्शुरन्स Life Insurance प्लान घ्यावा. हे कॅश व्हॅल्यू देखील प्रदान करते. पण, लाइफ इन्शुरन्सचे प्रीमियम महाग असतात. लाइफ इन्शुरन्स प्लान तुम्ही मध्येच बंद केल्यास या पॉलिसीची संपूर्ण रक्कम तुम्ही रिकव्हर करू शकत नाही. तुम्हाला फक्त जमा केलेली प्रीमियमची रक्कमच मिळेल. त्यामुळे दोन्ही प्रकारे माहिती घेतल्यावर तुम्ही निर्णय घेऊ शकता की तुमच्यासाठी टर्म इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्समध्ये कोणता इन्शुरन्स चांगला आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.