Tata Motors Discount Offer: टाटा मोटर्स ही टाटा समूहाची एक प्रमुख उपकंपनी आहे. भारतीय बाजारात टाटा मोटर्सचे अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत, विशेषतः इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कंपनीकडे सर्वाधिक मॉडेल्स आहेत. भविष्यात टाटा आणखी काही नवीन इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करणार आहे.
इलेक्ट्रिक सेगमेंट व्यतिरिक्त, टाटा मोटर्सकडे पेट्रोल, डिझेल, आणि सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांचे अनेक मॉडेल्स आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही लोकप्रिय कार्सवर डिस्काउंट ऑफर देते आहे.
कंपनीने आपल्या काही निवडक गाड्यांवर लाखो रुपयांचे डिस्काउंट उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे, टाटा कंपनी आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ व्हावी यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर देखील डिस्काउंट देत आहे.
सध्या, टाटा नेक्सॉन EV या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV वर सर्वाधिक 1.35 लाख रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे.
जर तुम्हाला या डिस्काउंटचा फायदा घ्यायचा असेल तर लवकरच ही गाडी खरेदी करावी लागेल कारण ही ऑफर फक्त जून महिन्यापुरती मर्यादित आहे. जून नंतर ही ऑफर बंद होऊ शकते.
कोणत्या मॉडेलवर मिळतोय सर्वाधिक डिस्काउंट?
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिकवर सर्वाधिक 1.35 लाख रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ही ऑफर टाटा नेक्सॉन 2023 इलेक्ट्रिक मॉडेलसाठी लागू आहे. 2024 टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिकवर 85,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
ही कार लोकप्रिय असल्याने आणि ग्राहकांची संख्या वाढावी यासाठी कंपनीने हा डिस्काउंट ऑफर सुरू केला आहे.
इलेक्ट्रिक SUV टाटा नेक्सॉनची किंमत किती आहे?
टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक SUV ची बेस वेरिएंटची किंमत 14.49 लाख रुपये आहे, तर टॉप वेरिएंटची किंमत 19.29 लाख रुपये आहे. या किमती एक्स-शोरूम आहेत, त्यामुळे ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहील.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.