sunita williams latest news: भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकून पडली आहे. तिच्यासोबत बुच विल्मोर देखील आहे. अमेरिकन अंतराळ संस्था (नासा) त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु अद्याप यश मिळालेले नाही. या संपूर्ण घटनेमुळे जगभरात चिंता वाढली आहे.
इस्त्रोची भूमिका स्पष्ट भारताच्या अंतराळ संस्था इस्त्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी म्हटले, “दुर्देवाने आम्ही त्यांची मदत करु शकत नाही. आमच्याकडे त्यांना वाचवण्यासाठी यान पाठवण्याची कोणतीही क्षमता नाही.” सोमनाथ यांनी स्पष्ट केले की अमेरिका आणि रशियाच या संकटातून सुनीता विल्यम्स आणि तिच्या सहकाऱ्यांना सोडवू शकतात.
अंतराळवीरांची स्थिती नियंत्रणात सोमनाथ यांनी सांगितले की, “अंतराळ स्थानकातील परिस्थिती अजून गंभीर नाही, मात्र सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.” तसेच त्यांनी नासाच्या आगामी बैठकीत बोइंगच्या नवीन कॅप्सूलद्वारे सुनीता विल्यम्स आणि तिच्या सहकाऱ्यांना पृथ्वीवर आणण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले.
तब्बल दोन महिन्यांनंतरही मार्ग अद्याप शोधला जात आहे, सुनीता विल्यम्सला सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाच्या पुढील पावलांचा संपूर्ण जगभरात मोठा उत्सुकता निर्माण झाला आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.