sukanya samriddhi yojana 2024:सुकन्या समृध्दी योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sukanya samriddhi yojana 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक योजना आत्ता पर्यंत सुरू केल्या त्यांनी मुलींसाठी देखील योजना राबविल्या आहेत त्यामध्ये बेटी बचाओ,बेटी पढायो हि योजना २०१५ मध्ये केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश हा मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे व शिक्षणाद्वारे त्यांना सक्षम बनविणे हा आहे.

केंद्र सरकारने बेटी बचाओ,बेटी पढायो या योजनेअंतर्गत सुकन्या समृध्दी योजना सुरू केलेली आहे. आर्थिदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना भविष्यामध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये हा या सुकन्या समृध्दी योजनेचा उद्देश आहे. मुलींच्या शिक्षणाची तसेच त्यांच्या लग्नाची चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृध्दी योजना सुरू केली आहे. ही योजना पूर्णपणे सरकारी योजना आहे. हि योजना केंद्र सरकारची मुलींसाठीची सर्वात कमी गुंतवणुकीची बचत योजना आहे.

sukanya samriddhi yojana 2024: सुकन्या समृध्दी योजनेचे लाभार्थी कोण असतील?

देशभरातील २१ वर्षाखालील सर्व जाती धर्माच्या मुली या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र आहेत.  अर्जदार मुलगी ही भारतीय रहिवाशी असणे आवश्यक आहे.

sukanya samriddhi account 2024: कसे उघडाल सुकन्या समृध्दी योजनेमध्ये आपले खाते?

 तुम्ही एखाद्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत दरवर्षी किमान २५० रुपये तुम्ही भरू शकता तसेच मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर जमा केलेली रक्कम व्याजासकट आई वडिलांना दिली जाते. या योजनेत खाते उघडल्या पासून फक्त १५ वर्षापर्यंत तुम्हाला पैसे भरायचे असतात त्यानंतर पुढील १५ ते २१ वर्षापर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे भरायची गरज नसते.

sukanya samriddhi yojana benefits 2024: सुकन्या समृध्दी योजनाची वैशिष्ट्ये काय आहेत

सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान २५० रुपये भरणे आवश्यक आहे तसे न केल्यास खाते बंद केले जाईल व खाते पुन्हा सुरू करण्यासाठी जितकी वर्षे खाते बंद होते त्या प्रत्येक वर्षासाठी ५० रुपये दंड आकारून खाते पुन्हा सुरू केले जाईल.

सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा कोअर बँकिंग सिस्टम च्या साह्याने तुम्हाला पैसे भरता येतात.

या योजनेअंतर्गत जमा रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही.

सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी हा मुलीचे वय २१ वर्षे होईपर्यंत केला गेला असला तरी ही सुरुवातीच्या १५ वर्षांपर्यंतच  पैसे जमा करायचे आहेत. तसेच मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर का मुलीचे लग्न झाले तर त्या मुलीला सुकन्या समृद्धी योजनेतुन रद्द केले जाईल व खाते ही बंद केले जाईल त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांनाही घेता येणार नाही.

मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण होऊन गेल्यावर सुद्धा जर लाभार्थी खात्यातून पैसे काढत नसेल तर त्या जमा रकमेवर सुद्धा व्याज देण्यात येईल.

मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावरच मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या आरोग्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून फक्त ५० टक्के रक्कम काढता येणार आहे.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा एखाद्या कारणामुळे मृत्यू झाल्यास जमा रक्कम व्याजा सकट लाभार्थ्याच्या पालकांना दिली जाईल.

जर एखाद्या कुटुंबात २ मुली असतील आणि दोन्ही मुलींना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दोन्ही मुलींच्या नावाची खाती उघडून याचा लाभ घेता येईल.

मोफत माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

sukanya samriddhi yojana post office 2024 सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  •  मुलीच्या जन्माचा दाखला
  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  •  पॅन कार्ड
  • मुलीच्या आई-वडिलांचा फोटो  
  • रहिवासी प्रमाणपत्र

sukanya samriddhi yojana details 2024 सुकन्या समृद्धी योजनेचे खाते खालील परिस्थितीमध्ये बंद करण्यात येईल.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडून तुम्हाला ५ वर्षे झाल्यास तुम्हाला तुमचे खाते बंद करता येईल. 

लाभार्थ्यांचा काही कारणास्तव मृत्यू झाल्यास खाते बंद करण्यात येईल.

लाभार्थ्याला काही आजार झाल्यास खाते बंद करण्यात येईल.

sukanya samriddhi yojana interest rate 2024 सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत लाभार्थ्यांना दिला जाणारा व्याजदर किती?

सुकन्या समृद्धी योजनेची सुरवात ही २०१५ मधे करण्यात आली तेव्हा व्याजदर हा ९.१ टक्के एवढा होता परंतु आता हाच व्याजदर कमी झाला असून तो ७.६ टक्के एवढा आहे.

मोफत माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार ;असा करा अर्ज 

1 thought on “sukanya samriddhi yojana 2024:सुकन्या समृध्दी योजना”

Leave a Comment