soybean rate today: इलेक्शन संपत आलं, सोयबीन भावाचं काय झालं; पहा आजचा सोयाबीन भाव !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोयबीन (soybean rate)  च्या दरात चढ-उतार, आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिरता

सोयबीन च्या दरातील (soybean rate)  चढउतार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबीन ची किंमत 12 डॉलरच्या आसपास असल्याचे दिसते. काल  दुपारी सोयबीन चे वायदे $12.19 प्रति बुशेल होते, तर सोयबीन पेंडीची किंमत $375 प्रति टन होती.

सध्या राज्यात सोयबीनची आवक वाढल्याचे दिसून येत आहे. पिवळ्या सोयबीनची आवक वाढल्याने काल दुपारी साडेचार वाजेपर्यंत 18 हजार 867 क्विंटल सोयबीनची आवक झाली आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना सोयबीनला (soybean rate)  हमी भाव मिळत नाही. सध्या सोयबीनचा भाव 4300 ते 4400 रुपयांच्या दरम्यान राहिला आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

सोयबीन (soybean) च्या दराबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिरता असूनही स्थानिक बाजारपेठेत हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. येत्या काही दिवसांतही या परिस्थितीत विशेष बदल अपेक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

देशभरात सोयबीनचे भाव (soybean rate ) स्थिर असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे

गेल्या काही दिवसांपासून देशातील बाजारपेठेत सोयबीन चे दर स्थिर आहेत. सध्या सोयबीन चा भाव 4200 ते 4500 रुपये आहे. सोयबीन वरील हा दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकेल, असा अंदाज सोयबीन बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

विविध बाजारात सोयाबीनचे भाव (soybean rate )

धाराशिवमध्ये 50 क्विंटल सोयाबीनचा भाव 4500 रुपये होता. हिंगोलीत पिवळ्या सोयाबीनला 4250 रुपये तर जालन्यात 4000 रुपये भाव मिळाला. सांगलीत पिवळ्या सोयाबीनचा बाजारभाव 4810 रुपयांवर पोहोचला आहे. आजमितीस केवळ एकाच बाजार समितीत सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा जास्त राहिला, तर उर्वरित बाजार समित्यांमध्ये 4500 रुपये भाव राहिला.

राज्यातील जिल्हा निहाय सोयाबीन भाव

जिल्हा जात/प्रत आवक सर्वसाधारण दर
अहमदनगर 24 4297
अहमदनगर लोकल 133 4400
अहमदनगर पिवळा 41 4350
अकोला पिवळा 4803 4400
अमरावती लोकल 5313 4363
अमरावती पिवळा 1144 4335
बीड 552 4451
बीड पिवळा 282 4450
बुलढाणा लोकल 1070 4300
बुलढाणा पिवळा 8305 4332
चंद्रपुर 81 4320
चंद्रपुर पिवळा 416 4084
छत्रपती संभाजीनगर 58 4345
धाराशिव 50 4500
धाराशिव पिवळा 373 4425
हिंगोली लोकल 950 4322
हिंगोली पिवळा 133 4225
जळगाव 200 4381
जालना लोकल 12 4000
जालना पिवळा 2700 4465
लातूर 3350 4543
लातूर पिवळा 15550 4490
नागपूर लोकल 320 4425
नागपूर पिवळा 440 4213
नांदेड 5 4400
नांदेड नं. १ 34 4300
नांदेड पिवळा 976 4475
नंदुरबार 5 4400
नाशिक 927 4427
नाशिक लोकल 4 4300
नाशिक पिवळा 22 4402
परभणी लोकल 260 4450
परभणी पिवळा 289 4373
सांगली लोकल 121 4700
सांगली पिवळा 17 4810
सोलापूर 279 4500
वर्धा पिवळा 5420 4130
वाशिम 4132 4254
वाशिम नं. १ 108 4610
वाशिम पिवळा 3273 4350
यवतमाळ पिवळा 1756 4398

Leave a Comment