soybean rate today: राज्यात सध्या सोयबीनला काय भाव मिळतोय; पहा पूर्ण माहिती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

soybean rate today:

प्रत्येक बाजार समितीचा
सोयाबीन भाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

गेल्या आठ महिन्यांपासून सोयबीनच्या दरात वाढ होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी दरवाढीची आशा ठेवून मागील वर्षभरापासून सोयबीनचे पीक घरातच ठेवले आहे.

देशातील बाजारात सोयबीनची आवक कमी झाली आहे, परंतु स्वस्त तेलाची आयात आणि सोयापेंडचे घसरलेले भाव यामुळे सोयबीनचे दर अजूनही दबावात आहेत. सध्या सोयबीन सरासरी ४१०० ते ४५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

प्रत्येक बाजार समितीचा
सोयाबीन भाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

बाजारपेठेत सोयबीन कमी प्रमाणात विक्रीस येत असल्याने व्यापारीही त्रस्त झाले आहेत. सोयबीन बियाणाचे दर गतवर्षीपासून वाढत आहेत. मात्र, सोयबीनच्या किमती घसरल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सोयबीन चार हजार रुपये तर बियाणे बारा हजार रुपये क्विंटल दराने विकले जात आहेत. सोयबीन बियाणाची २५ किलोची एक पिशवी घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सोयबीनला भाव कधी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

प्रत्येक बाजार समितीचा
सोयाबीन भाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. सोयबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.५३ डॉलर्स प्रति बुशेल्सवर होते, तर सोयापेंडचे वायदे ३२७ डॉलर्स प्रति टनांवर होते.

प्रत्येक बाजार समितीचा
सोयाबीन भाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

मागील वर्षी सोयबीन येलो मोझेक या रोगाच्या प्रभावामुळे पिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. त्यामुळे या पिकाच्या लागवडीसाठी केलेला खर्चही भरून निघाला नाही. सोयबीनचे दर पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दरवाढ होईल, या आशेने सोयबीन घरातच ठेवले होते, पण वर्षभराची वाट पाहूनही दरवाढ झाली नाही.

Leave a Comment