soybean : सोयबीनवर अळ्यांचा हल्ला वेळीच करा ‘या’ उपाययोजना; पहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean:

औरंगाबाद (Soyabean): सध्या सोयाबीन पिके वाढीच्या अवस्थेत असताना, रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पाने खाणाऱ्या अळ्या आणि खोड किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. पुढील काही दिवसांत असेच वातावरण राहिल्यास तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा) देखील सोयाबीनवर हल्ला करण्याची शक्यता आहे.

पीक विमा भरताना या 5 गोष्टी वर लक्ष ठेवा; नाहीतर पीक विमा मिळणार नाही
👆
वरील वाक्यावर क्लिक करा व पहा 👆

कृषि तज्ञांचा सल्ला:

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे तज्ञ डॉ. डी.डी. पटाईत, डॉ. जी.डी. गडदे, आणि श्री. एम.बी. मांडगे यांनी शेतकऱ्यांना किडींचा प्रादुर्भाव ओळखून वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

उपाययोजना:

– सुरुवातीच्या अवस्थेत पिके तणमुक्त ठेवा.

– बांधावर असणाऱ्या किडींच्या पुरक खाद्य वनस्पतींचा नाश करा.

– किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या नष्ट करा.

– तंबाखुची पाने खाणाऱ्या अळीची अंडी आणि सुरुवातीच्या अवस्थेतील अळीग्रस्त पाने नष्ट करा.

– हिरवी घाटेअळी आणि तंबाखुची पाने खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाची पातळी ओळखण्यासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावा.

– इंग्रजी ‘T’ अक्षरासारखे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावा.

– स्पोडोप्टेरा अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. ५०० एल.ई. विषाणू ४०० मि.ली. किंवा नोमुरिया रिलाई जैविक बुरशीची ८०० ग्रॅम प्रति एकरी फवारणी करा.

पीक विमा भरताना या 5 गोष्टी वर लक्ष ठेवा; नाहीतर पीक विमा मिळणार नाही
👆
वरील वाक्यावर क्लिक करा व पहा 👆

पाने खाणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन:

– ५% निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिन १५०० पीपीएम ५०० मि.ली. प्रति एकरी फवारणी करा.

– किडींने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास प्रोफेनोफॉस ५०% ४०० मि.ली. किंवा इथिऑन ५०% ६०० मि.ली. किंवा थायमिथाक्झाम १२.६% अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% ५० मि.ली. किंवा क्लोराट्रानिलीप्रोल १८.५% ६० मि.ली. प्रति एकर फवारावे.

सावधानता:

– फवारणी आलटून-पालटून करावी आणि एका वेळी एकच कीटकनाशक फवारावे.

– इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते मिसळू नये.

– कीटनाशके फवारणी करताना संरक्षक उपाययोजना करावी.

अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी ०२४५२-२२९००० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Comment