Soybean Cotton Anudan: कापूस सोयाबीन अनुदान या तारखेला खात्यात जमा होणार; यादीत नाव पहा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Cotton Anudan: राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली आहे, पण हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याबद्दल अद्याप संभ्रम आहे. चर्चेनुसार, २१ ऑगस्टपासून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, परंतु कृषी आणि महसूल विभागाच्या काही प्रक्रियेमुळे उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तातडीचा संदेश | हवामान विभागाचा इशारा
महाराष्ट्रात 18 ऑगस्टपासून भयंकर पाऊस, या भागांत पुराची शक्यता

अनुदानाच्या वितरणात विलंबाचे कारण Soybean Cotton Anudan

विलंबाचे दोन मुख्य कारणं समोर आली आहेत. पहिले, २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पाहणी नोंदणीमध्ये उडालेला गोंधळ आणि दुसरे म्हणजे कृषी आणि महसूल विभागाचा कारभार. राज्यातील ९० लाख सोयाबीन आणि कापूस उत्पादक या योजनेला पात्र ठरले असून, त्यामध्ये ५८ लाख सोयाबीन उत्पादक आणि ३२ लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.

अनुदानाचे वितरण कधी होणार? Soybean Cotton Anudan:

राज्य सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कृषी आयुक्तांच्या नावाने खाता उघडण्यासाठी मान्यता दिली आहे. या योजनेसाठी ४१९४ कोटी रुपयांचा निधी या खात्यावर जमा केला जाणार आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, अनुदानाची रक्कम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल.

महिंद्रा 5 डोअर थार लॉन्च, कमी किमतीत जोरदार धमाका !
येथे क्लिक करा व पहा

शेतकऱ्यांची चिंता वाढली

शेतकऱ्यांची ई-पिक पाहणीत नोंदणी केली असली तरीही यादीत नावं नसल्याने शेतकरी नाराज आहेत. महसूल विभागाच्या डाटानुसार, यादी जाहीर करण्यात आली आहे आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनुदान जमा होईल असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. तरीही शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे आणि या अनुदानाच्या वाटपाची प्रतीक्षा सुरु आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना संमती पत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र भरून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून अनुदानाच्या वितरण प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही.

Leave a Comment