Soyabean: सोयाबीनचे उत्पादन दुप्पट करण्याचा गुपित फॉर्म्युला! शेतकऱ्यांनी ‘हे’ औषध फवारायलाच हवं!”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean: सोयाबीनचे उत्पादन दुप्पट करण्याचा गुपित फॉर्म्युला! शेतकऱ्यांनी ‘हे’ औषध फवारायलाच हवं!”सोयाबीनचे उत्पादन वाढवायचंय? मग ‘हे’ औषध फवारणे विसरू नका!

सोयाबीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजचा लेख अत्यंत उपयुक्त आहे. महाराष्ट्रात सोयाबीन हे महत्त्वाचं नगदी पीक असून, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये याची सर्वाधिक लागवड केली जाते.

देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे, ज्यामुळे हे राज्य सोयाबीन उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानावर मध्य प्रदेश असून, देशाच्या एकूण उत्पादनापैकी 45% सोयाबीन तिथे पिकवलं जातं. महाराष्ट्रातही देशाच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास 40% सोयाबीन पिकवलं जातं. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं अर्थकारण सोयाबीनवरच अवलंबून आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. एकरी उत्पादन घटत चाललं आहे, आणि यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि सोयाबीनचं उत्पादन वाढवण्यासाठी एका विशेष औषधाची फवारणी करणं आवश्यक आहे.

हे औषध फवारल्यानं सोयाबीनच्या फुलधारणा आणि फळधारणा वाढते, ज्यामुळे उत्पादन वाढतं. शेतकऱ्यांनी फुलगळ थांबवण्याची काळजी घेतली पाहिजे आणि फुलांची व फळांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

या औषधामध्ये अमिनो आणि पेपटिक ऍसिड असतात, ज्यामुळे पिकाची गुणवत्ता सुधारते. हे औषध मार्केटमध्ये ‘सीओ 1010 एल’ या नावाने उपलब्ध आहे, आणि याचा वापर इतर कडधान्य पिकांमध्येही करता येतो.

फुलगळ थांबवून, उत्पादन वाढवण्यासाठी या औषधाचा वापर शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो.

Leave a Comment