soyabean rate today: नमस्कार शेतकरी मित्रहो, ह्या लेख मध्ये आपण सध्या सोयबीन बाबत काय घडामोडी सुरु आहेत, शेतकरी बांधवाना त्यांच्या मनातील भाव मिळेल का ? आंतराष्ट्रीय मार्केट मध्ये काय सुरु आहे? सोयबीन खाद्य तेलाचे भाव काय सुरु आहेत ? सोयापेंड च काय सुरु आहे ? खाद्य तेलाच्या आयातीचे काय सुरु आहे ? ह्या सर्व गोष्टींचा भावावर काय परिणाम आहे? सध्याचे सोयाबीन रेट काय सुरु आहेत ? सोयबीन भाव कधी ६००० होणार आणि शेतकरी बांधवानी कधी सोयाबीन विकायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत. अतिशय महत्वाचा हा लेख आहे तरी आपण शेवटपर्यंत वाचायचा आहे.
एका शेतकरी युट्युबर चा सोयबीन व्यापारी सोबत झालेला हा सवांद खूप महत्वाचं आहे तो आपण प्रश्न आणि उत्तर स्वरूपात आहे तो खालीलप्रमाणे आहे. यातून प्रत्येक शेतकरी बांधवाना सोयाबीन विकावं कि थांबावं याच उत्तर मिळणार आहे.
प्रश्न: सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवानी सोयाबीन विकायचे थांबवले आहे कारण शेतकरी शेतकरी बांधवाना ६००० रुपये रेट ची प्रतीक्षा आहे? तर सोयाबीन चा रेट ६००० होईल का ? नेमकी काय समीकरणे आहेत सध्या ?
उत्तर : आजची बाजाराची परिस्थिती पाहता सोयाबीनचे भाव जे पडले आहेत त्याला मुख्य कारण सध्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेल आयात केलेलं आहे त्यामुळे सोयाबीनचे दर एकदम खाली आलेले आहेत.
प्रश्न: सोया तेल चे आयात शुल्क कमी केले आहे व सोयपेंड ची निर्यात होते का सध्या? याबाबत काय सांगाल ?
उत्तर : सोयपेंड निर्याती बाबतीत बोलायचे झाले तर सोयपेंड ची पण खूप आहे त्यामुळे जास्त प्रमाणात याची निर्यात होत नाही पण ५०% निर्यात होते.
प्रश्न : सोयपेंडची निर्यत झाली तर भारतातील सोयाबीनचे भाव वाढतील का ?
उत्तर: सोयपेंडची निर्यत झाली तर भाव १००% वाढतील पण तशी शक्यता यावर्षी दिसत नाही आहे.
प्रश्न : यावर्षी सोयाबीनचे उत्पादन मागच्या वर्षी च्या तुलनेत कसे आहे ? याचा सोयाबीन भावावर काही परिणाम आहे का?
उत्तर: यावर्षी सोयाबीनचे उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेत ५० ते ६० % आहे.
प्रश्न: सध्या सोयाबीन भाव महाराष्ट्र काय आहेत?
उत्तर : सध्या चांगल्या क्वालिटी चे सोयाबीनचे दर ४८०० ते ४९०० आहेत. पण सुरु झाल्यास यात २०० ते ३०० रुपयाची सुधार होऊ शकते. व सोयाबीन चा महाराष्ट्रातील भाव ५००० ते ५१०० होऊ शकेल.
प्रश्न: बहुतांश शेतकरी ६००० रुपये भावाची अपेक्षा ठेऊन थांबले आहे तर त्यांनी काय करावे?
उत्तर : ज्या शेतकरी बांधवांची थांबण्याची कॅपिसिटी आहे त्या बांधवानी मे ते जून पर्यन्त थांबू शकत असतील तर त्यांनी थांबावे कारण त्या दरम्यान भावात सुधारणा होऊन भाव वाढू शकतात पण सध्याचे सरकारी धोरण पाहता भाव वाढण्याची शक्यता कमी आहे व सॊयाबीन भाव हे ५१०० ते ५५०० दरम्यान खळते राहतील.
प्रश्न: आपले सोयाबीन रेट जागतिक बाजपथेप्रमाणे आहेत कि कमी आहेत?
उत्तर: जातीक बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे रेट आपल्यापेक्षा कमी आहेत त्यामुळे सोयाबीन तेल हे कमी भावात आयत होत आहे त्यामुळे भारतातील तेल पण स्वस्त विकावे लागत आहे व आपले भाव सुधारण्यास अडथळा निर्माण होत आहे.
प्रश्न: सोयाबीन वायदे वर सध्या बंदी आहे तर याचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकरी वर बसतोय का ?
उत्तर: वायद्यामुळे बाजारातील रोजची अपडेट लोकांना कळते व सोयाबीन चे बाजार प्लस मायनस होतात ते शेतकरी ना कळते पण आता प्लांटवाल जो भाव काढेल त्या भावाने शेतकारी ना सोयाबीन विकावे लागत आहे.
प्रश्न: तर सध्याच्या द्विधा मनस्थिती मध्ये असलेल्या शेतकरी बांधवाना काय सांगाल ? कारण हमीभाव ४६०० आहे आणि सोयाबीन जात आहे ते ४९०० ने तर शेतकरी बांधवानी काय करावे ?
उत्तर: शेतकरी ना कमीत कमी ६००० रुपये तरी भाव मिळायला पाहिजे तर परवडेल कारण सध्या सोयाबीनचे खर्च वाढले आहेत आणि भाव तोच आहे यामुळे शेतकरी चे नुकसान होत आहे, शेतकरी कडे सरकारने लाख दिले पाहिजे ४९०० ते ५००० हा भाव फार कमी आहे, त्यामुळे कमीत कमी ६००० भाव आलं तरच शेतकरी समाधानी होईल.
प्रश्न : सध्या सोयाबीनची आवक कशी आहे ?
उत्तर : यावर्षी अगोदरच उत्पादन कमी आहे व त्यात भाव कमी यामुळे आवक ७०% कमी आहे.
तरी शेतकरी बांधवाना या लेखातून चांगली माहिती मिळालेली असेल अशी आशा करतो आणि अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
रोजच्या बाजारभावासाठी ग्रुप जॉईन करा👇🏻
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
चांगली माहिती दिली आहे, धन्यवाद