sbi yojana: एसबीआयची ग्राहकांना भेट;  नवीन ‘अमृत वृष्टी’ एफडी योजना !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sbi yojana: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन मुदत ठेव (FD) योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव ‘अमृत वृष्टी’ आहे. ही योजना 15 जुलै 2024 पासून लागू झाली असून, यात गुंतवणूकदारांना अधिक व्याज मिळवण्याची संधी आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर घसरणार
पहा तुमच्या जिल्ह्यातील दर

ही योजना भारतीय आणि अनिवासी भारतीय ग्राहकांसाठी खुली आहे. गुंतवणूकदार एसबीआय शाखा, इंटरनेट बँकिंग आणि योनो ॲपच्या माध्यमातून या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात.

किती व्याज मिळणार?

‘अमृत वृष्टी’ योजनेत 444 दिवसांसाठी 7.25 टक्के वार्षिक व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल, त्यामुळे त्यांना एकूण 7.75 टक्के व्याज मिळेल. या एफडीवर कर्ज घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

विरोधातील याचिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय
लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला दिला…

योजना मर्यादित कालावधीसाठी

 एसबीआयची ‘अमृत वृष्टी’ योजना 15 जुलै 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उपलब्ध असेल. या योजनेत तुम्हाला 444 दिवसांसाठी पैसे जमा करावे लागतील. अधिक व्याज मिळविण्याच्या संधीसाठी ही योजना खूप फायदेशीर ठरू शकते. ज्यांना दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायक आहे.

व्याज पेमेंट

या विशेष एफडीचे व्याज मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक जमा केले जाते. टीडीएस कापल्यानंतर बँक ग्राहकाच्या खात्यात व्याज जमा करते.

अचानक खाद्य तेल झाले स्वस्त
पहा 15 व 7 लिटर डब्ब्याचा कमी झालेला दर !

मुदतीपूर्वी पैसे कसे काढायचे?

5 लाख रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी मुदतपूर्व काढण्यासाठी 0.50 टक्के शुल्क भरावे लागेल, तर 5 लाख ते 3 कोटी रुपयांच्या एफडीवर 1 टक्के शुल्क भरावे लागेल.

एसबीआय अमृत कलश

एसबीआयने यापूर्वी ‘अमृत कलश’ नावाची योजना सुरू केली होती. या योजनेत सर्वसामान्य नागरिकांसाठी 7.10 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 400 दिवसांच्या कालावधीत 7.60 टक्के व्याज उपलब्ध आहे.

नवीन ‘अमृत वृष्टी’ एफडी योजनेच्या माध्यमातून एसबीआय आपल्या ग्राहकांना अधिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने ही योजना सादर केली आहे.

Leave a Comment