SBI ची नवीन अमृत वृष्टी FD योजना: मिळवा 7.75% पर्यंत धमाकेदार व्याज !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ‘अमृत वृष्टी’ मुदत ठेव (FD) योजना जाहीर केली आहे. ही योजना 15 जुलै 2024 पासून सुरू झाली असून, भारतीय आणि अनिवासी भारतीय ग्राहकांसाठी खुली आहे. ग्राहक एसबीआय शाखा, इंटरनेट बँकिंग आणि योनो ॲपद्वारे या विशेष एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात.

गोडे तेलाचा भाव घसरला
पहा आजचा १५ लिटर आणि ५ लिटर डब्याचा भाव

किती व्याज मिळणार?

‘अमृत वृष्टी’ योजनेत 444 दिवसांच्या मुदतीसाठी 7.25 टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के जास्त व्याज, म्हणजेच एकूण 7.75 टक्के व्याज मिळेल. या एफडीवर कर्ज घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

मर्यादित कालावधीसाठी योजना

SBI ची ‘अमृत वृष्टी’ योजना चा कालावधी  15 जुलै 2024 ते 31 मार्च 2025 असा आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना 444 दिवसांसाठी पैसे ठेवावे लागतील. ही योजना ग्राहकांना जास्तीत जास्त व्याज मिळविण्याची संधी देते. विशेषतः, दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही योजना लाभदायक ठरेल.

व्याज पेमेंट

या विशेष एफडीचे व्याज प्रत्येक महिना, दार तीन महिना व दार  सहा महिना  आणि वार्षिक स्वरूपात जमा करण्यात येईल. टीडीएस कापल्यानंतर बँक ग्राहकाच्या खात्यात व्याज जमा करेल.

मुदतीपूर्वी पैसे कसे काढायचे?

5 लाख रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी मुदतपूर्व काढणीसाठी 0.50 टक्के शुल्क लागेल. 5 लाख ते 3 कोटी रुपयांच्या एफडीसाठी 1 टक्के शुल्क लागू होईल.

यापूर्वी एसबीआयने ‘अमृत कलश’ योजना सुरू केली होती, ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 400 दिवसांच्या कालावधीत 7.60 टक्के व्याज दिले जात होते.

योजना माहितीचा WhatsApp ग्रुप जॉईन करा
 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

WHATSAPP GROUP LINK

Leave a Comment