नागपूर जिल्ह्यामध्ये संत्रा, कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. नैसर्गिक संकटामुळे शेती करणे जिकिरीचे ठरत असताना नरखेड तालुक्यातील मौजा पिंपळदरा येथील हरिभाऊ लक्ष्मण खुजे यांनी पारंपरिक शेती पद्धतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय सुरू केला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत त्यांनी आपल्या तीन एकर शेतामध्ये रोपवाटिका सुरू केली.
शासनाच्या कल्याणकारी योजनेतून त्यांनी शेतामध्ये शेडनेट उभा करून गुरू गजानन रोपवाटिका तयार केली. श्री. खुजे यांनी प्रचलित पद्धतीने शेडनेट न उभारता तीन एकर शेतीमध्ये पॉलिटनेल तयार केले. या रोपवाटिकेमध्ये शेडनेटच्या माध्यमातून त्यांनी भाजीपाला रोपांचे उत्पादन व विक्री सुरू केली. यामुळे परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा भाजीपाला रोपे उपलब्ध झाली.
शेडनेट व पॉलिटनेल तयार करताना त्यांना तालुका कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या रोपवाटिकेमुळे श्री. खुजे यांना उत्पादन व विक्रीतून दरवर्षी चार लाख रुपयांचा आर्थिक फायदा होतो. कृषी विभागांतर्गत आयोजित चर्चासत्रामध्ये त्यांना कृषी विभागातील विविध योजनांची माहिती मिळाली.
कृषी विभागातील कृषी सहायक व्ही. एस. ठाकरे व कृषी पर्यवेक्षक ओ. व्ही. गहूकर यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेची माहिती दिली. माहिती मिळताच कृषी विभागाकडे अर्ज करून प्रशिक्षण घेतले आणि दोन महिन्यांत शेडनेट आणि पॉलिटनेल उभारणी करून रोपे तयार करून विक्री सुरू केली
वांगी ५० हजार, टमाटर १० हजार, मिरची ३ लाख, कोबी ३५ हजार, टरबूज १ लाख, खरबूज १० हजार, तसेच झेंडू १० हजार अशा प्रकारे रोपे तयार करून विक्री करत असून याप्रमाणे दरवर्षी ३ लाख रुपयांचा नफा होत असल्याचे श्री. खुजे यांनी सांगितले.
प्रगतिशील महिला शेतकरी मेघा देशमुख
परभणीपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावरील झरी गावच्या मूळ असलेल्या मेघा देशमुख यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवला आहे. त्यांची पूर्वपरिस्थिती फार बिकट होती. पतीची २१ वर्षांपूर्वीच साथ सुटल्यामुळे घरची आणि उत्पन्नाची सर्व जबाबदारी ही मेघा देशमुख यांच्यावर येऊन पडली.
घरी ३८ एकर शेतजमीन पण पाणी नाही. त्या वेळी करायचे काय हाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. पण सर्व विचाराअंती मेघताई यांनी निर्धाराने शेती करायची ठरवून त्यांनी प्रयत्न सुरू केले. चार वर्षांपूर्वी जमीन, वातावरण, पाण्याची कमतरता पिकांचा अनुभव बाजाराची मागणी आदी सर्व बाबींचा नीट अभ्यास करून तसेच येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनानुसार काळ्या खडकाळ आणि चौपण (पाणी धरणाऱ्या) जमिनीच्या आठ एकर क्षेत्रावर त्यांनी पेरुची, तर आठ एकरवर लिंबोणी आणि नऊ एकरवर सीताफळाची लागवड केली.
सोबतच उर्वरित १३ एकरावर सोयाबीन, हरभरा, ज्वारी, भुईमूग अशी आंतरपिकेदेखील त्यांनी घ्यायला सुरुवात केली.
मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने त्या दरवर्षी पावसाळ्यात विहिरीचे पुनर्भरण करून घेतात. ज्यामुळे त्यांच्या विहिरीची पाणी पातळी वाढण्यास मदत होते. या उपाययोजनेद्वारे उपलब्ध झालेले पाणी पाटा न देता सूक्ष्म सिंचन पद्धतीने आणि ठिबकद्वारेच ते फळबाग जगवण्याचे काम करतात. त्यानंतर शेतीकामासाठी मजुरांची मोठी समस्या असल्याने कृषी यांत्रिकीकरणावर त्यांनी भर दिला आहे. मशागतीची कामे, बागेची छाटणी असे मेहनती काम त्या करतात.
माझ्या शेतीमध्ये शेतीसाठी पाण्याची खूप कमतरता होती. शेतातील विहिरीचे पावसाळ्यात पुर्नभरण करून घेतली. त्यानंतर ड्रिपींगद्वारे संपूर्ण फळबागेला पाणी पुरवले. कृषी क्षेत्राशी निगडित असलेले जोडव्यवसायदेखील आपण करायला पाहिजे. तसेच शेतकऱ्याने हार न मानता, आलेल्या परिस्थितीत निसर्गाशी सामना करायला शिकले पाहिजे. मला सांगायला आनंद वाटतो की, जेव्हा मी हे सुरू केले त्या वर्षी मला ६० टन पेरूचे उत्पादन झाले आणि त्यानंतरच्या वर्षात या उत्पन्नात वाढ होत गेल्याचे मेघा देशमुख यांनी सांगितले.
कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत मेघा देशमुख यांनी इंदिरा महिला स्वयंसाहाय्यता शेतकरी बचतगटाची उभारणी करत महिलांना रोजगार उपलब्ध करून त्या महिलांना सक्षम करण्याचे काम करत आहेत.
या बचतगटाच्या माध्यमातून पोकराअंतर्गत त्यांनी धान्याची साठवणूक करण्याकरिता गोडाऊन उभारणीकरिता ६० टक्के अनुदानावर ६० लाखाचे कर्ज मिळवून गोडाऊनची उभारणी केली. या माध्यमातून बचतगटातील महिलांना रोजगार मिळण्यास तसेच त्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत झाली. श्रीमती देशमुख यांच्या कार्याची दखल घेत, अनेक पुरस्कारांनी मेघा देशमुख यांना गौरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
खाद्य तंत्रज्ञ ते सरबत उत्पादक , 'मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत' चालू वर्षी १ कोटी ७ लाख ५० हजार प्रकल्प खर्चाचा प्रस्ताव सादर
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
help mi