Rain update:”सतर्कतेचा इशारा! आठवडाभर राज्यात मुसळधार पावसाचा कहर, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना धोका!”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain update:राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता, आणि तो आता खरा ठरत आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला आहे. राज्यभर पावसाचे प्रमाण वाढले आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये शनिवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर होता, रात्रीही पाऊस झाला. रविवारी मात्र पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला. पण पुण्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. हवामान खात्याने पुढील आठवडाभर पावसाचा जोर राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.

पुण्यासह, सातारा, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे प्रशासन हायअलर्टवर आहे. मराठवाड्यात लातूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.

सीएनजी स्टेशनचे मालक बना! जिल्ह्यात सीएनजी जाळं विस्तारणार!

पुण्यात मुळा आणि मुठा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. नाशिकमध्येही अतिवृष्टी होत असून त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातही पावसाची संततधार सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या तीन जिल्ह्यांत प्रशासन हायअलर्टवर आहे.

पुन्हा सोन्याच्या भावात मोठी घसरण; शेयर मार्केट पडल्याचा परिणाम! पहा आजचा भाव

राज्यात पुढील पाच दिवस हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे, सातारा, नाशिक, मुंबई आणि उपनगरे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातही पुढील पाच दिवस हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजना अर्जात चूक झाली; जाणून घ्या कसा मिळवता येईल लाभ आणि दुरुस्तीची सोपी प्रक्रिया!

नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरण आणि बंधाऱ्यांमधून सकाळपासून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी येत आहे. सध्या मराठवाड्यातील एकूण धरणसाठा 19.91 टक्के आहे. नाशिकच्या पाच धरणांमधून विसर्ग सुरू असल्याने जायकवाडीतील धरण साठ्यात आता वाढ होणार आहे. पुणे शहर परिसरात सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी होत असला तरी धरणातील पाणीसाठा वाढल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे नदी पात्राच्या परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.

Leave a Comment