rain news: राज्यात अजून किती दिवस पावसाचा मुक्काम; पहा पावसाचा अंदाज !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

rain news: आजचा हवामान अंदाज : राज्यातील हवामान विभागाने आज (ता. २१) सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे.

लाखो शेतकऱ्यांना 21 ऑगस्टला मिळणार मोठं गिफ्ट
कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून महत्त्वाची घोषणा

हवामान स्थिती :

राज्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट, आणि जोरदार पावसाने वातावरणात थोडासा गारवा आणला आहे. ढगाळ हवामानामुळे उन्हाची तीव्रता काहीशी कमी झालेली आहे. वळीव स्वरूपाचा पाऊस राज्याच्या विविध भागात पाहायला मिळत आहे, ज्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आज कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

सध्याची हवामान परिस्थिती :

मध्य बांगलादेश आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, या प्रणालीमुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याचवेळी, मॉन्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगरपासून सुरु होऊन रोहतक, ओराई, चुर्क, मालदा आणि कमी दाबाच्या क्षेत्रात सक्रीय आहे.

राज्यात कांद्याचा भाव कडाडला
पहा आजचा बाजारभाव

उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशातील १.५ किलोमीटर उंचीवर आणि अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून मालदीवपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पसरला आहे.

तापमान स्थिती :

मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत जेऊर येथे उच्चांकी ३६.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात वळीव स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाने दणका दिला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

News Source : IMD Department, Maharshtra

Leave a Comment