Raghani Food Processing: नाचणी अन्नप्रक्रिया उद्योग;७ ते ८ कोटींच्या वार्षिक उलाढाल!
पौष्टिक तृणधान्ये आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यातही नाचणीचे आहारातील महत्त्व लाभदायी आहे. लहान बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी नाचणीचे गुणधर्म पोषक आहेत.
यामुळेच राज्यासह देशात आणि परदेशातही नाचणीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन राघवेंद्र हरीष व्हटकर यांनी चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथे ‘हरिलक्ष्मी एंटरप्रायझेस अन्नप्रक्रिया उद्योग’ नावाने नाचणी प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. २०२१-२२ मध्ये या उद्योगासाठी ७८ लाखांची आधुनिक यंत्रसामग्री खरेदी केली.
यासाठी शासनाकडून २४ लाख रुपयांचे अनुदान मिळाले. सध्या ७ ते ८ कोटींच्या वार्षिक उलाढालीतून साधारण १५ ते २० लाख रुपये नफा ते दरवर्षी मिळवत आहेत. राज्य शासनाच्या कृषी कृषी विभागाच्या वतीने मिळालेल्या मदतीमुळे श्री. व्हटकर यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत झाली.
राघवेंद्र व्हटकर हे जिल्ह्यातील नाचणी उत्पादक शेतकऱ्यांकडून कच्चा माल ( करडा नाचणी) खरेदी करून साठवणूक करतात. नंतर या नाचणीवर प्रक्रिया करून घेतात. सुरुवातीला खडा, माती, काड्या, कचरा वेगळा करून नाचणी स्वच्छ केली जाते. यानंतर नाचणीला पॉलिश करून नाचणीवर असणारा कोंड्याचा थर वेगळा काढला जातो.
यानंतर नाचणीची आकारानुसार बारिक, मोठी अशी वर्गवारी केली जाते. यानंतर ग्राहकांच्या म्हणजेच बाजारपेठेच्या मागणी नुसार त्या-त्या बँडनुसार पॅकेजिंग केले जाते. हरिलक्ष्मी पॅकेट बंद नाचणी राज्य आणि देशात पाठवण्याबरोबरच परदेशातही मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.
हरिलक्ष्मी एंटरप्रायझेस अन्नप्रक्रिया उद्योगाच्या नाचणीला राज्यभरात १ हजार ६०० टनाची, तर परराज्यातून ८०० टनाची मागणी आहे. उत्तम प्रतीची नाचणी असल्यामुळे देशासह विदेशातूनही त्यांच्या ब्रँडची साधारण ४०० टन नाचणीची निर्यात वर्षभरात केली जाते. नाचणीला चांगली मागणी आहे.
वर्षभरात तब्बल ४०० टनाची नाचणी केवळ परदेशात निर्यात केली जाते. सध्या वर्षाला २ हजार ८०० टन नाचणी आहे. यातून वर्षाला तब्बल ७ ते ७.५ कोटींची उलाढाल होत असून वर्षभरात १५ ते २० लाख रुपये नफा होत आहे. शेती उत्पादित मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया कृषी योजनेसह विविध योजनांतून भरघोस अनुदान मिळत आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
3 thoughts on “Raghani Food Processing: नाचणी अन्नप्रक्रिया उद्योग;७ ते ८ कोटींच्या वार्षिक उलाढाल!”