punjab dakh:प्रख्यात हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी लासलगाव व परिसरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यांनी सांगितले की, लासलगाव, मालेगाव, आणि चाळीसगाव परिसरात पावसाचे प्रमाण सध्या कमी आहे, परंतु 18 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
रक्षाबंधनच्या निमित्ताने सोने दरात मोठे बदल, जाणून घ्या आजचे गोल्ड-सिल्वरचे दर !
विशेषतः, 20 ऑगस्ट रोजी लासलगावमध्ये मुसळधार पाऊस पडेल, ज्यामुळे शेतात पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. लासलगावसह मनमाड, चाळीसगाव, धुळे, आणि नंदुरबार या भागातही पाऊस होईल, परंतु लासलगाव परिसरात पावसाचे प्रमाण जास्त राहील.
राज्याच्या इतर भागांसाठीही त्यांनी हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. पूर्व व पश्चिम विदर्भात पाऊस 24 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. मराठवाड्यातही पाऊस सुरू होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी मूग पिकाची काढणी तातडीने पूर्ण करावी.
फ्री वीज आणि शून्य वीजबिल! मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली मोठी योजना!”
सातारा, सांगली, सोलापूर, आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह राज्यातील अनेक भागांत 18 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भातील यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती, तसेच मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, परभणी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, सांगली या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अधिक राहील.
शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करावे, विशेषतः विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगावी. राखी पौर्णिमा ते पोळ्यापर्यंत म्हणजेच 17 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान पावसाचा काळ राहणार असल्याचे डख यांनी सांगितले आहे.
तसेच, पावसात अचानक बदल झाल्यास शेतकऱ्यांना त्वरित कळविण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंजाबराव डख यांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊन पुढील हवामानाच्या अपडेट्स मिळवावेत.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.