Punjab dakh havaman andaj: 5 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोरदार कहर! आपल्या जिल्ह्यात कसा असेल ?”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab dakh havaman andaj:मागील काही दिवसांत महाराष्ट्राच्या अनेक भागांत जोरदार पाऊस पडला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. पुणे आणि कोल्हापूरमध्ये पूरामुळे मोठे नुकसान झाले.

सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे आणि पूरस्थिती निवळली आहे. मात्र, याचा शेतीवर आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झालाय. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे आणि पूरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर;सरकार देणार 5 हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान GR जारी!

ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबरावांनी नव्याने हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, पुढील दोन दिवसांत राज्याच्या काही भागांत पावसाचा जोर वाढेल. हा पाऊस पुढील महिन्याभर कायम राहील. विशेषतः ५ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस असाच चालू राहील.

पंजाबरावांच्या अंदाजानुसार, दररोज पावसाची तीव्रता भागानुसार बदलणार आहे. काही भागांत रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कोकण, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागांत चांगला पाऊस पडेल.

तुरीच्या भावात सुधारणा; पहा आजचे भाव !

यावर्षी अनेक प्रमुख धरणं शंभर टक्के भरतील, यामुळे पाण्याची कटकट होणार नाही असं पंजाबरावांचं म्हणणं आहे. गेल्यावर्षीची परिस्थिती यंदा राहणार नाही हे स्पष्ट आहे. भारतीय हवामान खात्याने देखील राज्याच्या काही जिल्ह्यांत तीन ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आय एम डी ने सांगितलं आहे की, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पूर्व विदर्भातील सहा तसेच पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत तीन ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांत ३ ऑगस्टपर्यंत अति जोरदार पाऊस पडणार आहे. खानदेश वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत मध्यम पाऊस पडणार आहे आणि एक ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढेल. मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांत तीन ऑगस्टपर्यंत मध्यम पाऊस पडणार आहे.

ब्रेकींग न्यूज: पिक विमा वितरणाच्या सुरुवातीचा निर्णय, सर्व जिल्ह्यांचे पिक विमा मंजूर

Leave a Comment