Pik Vima Yojana: पिक विमा भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढ; दिलासा देणारी बातमी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima Yojana: यावर्षी जून-जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकरी पेरणीच्या कामात सतत व्यस्त आहेत. पाऊस आणि खराब हवामानामुळे ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्येही अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सीएससी केंद्रांवर नोंदणी करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यातच महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

शेतकरी योजना माहितीचा WhatsApp ग्रुप जॉईन करा
 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

महिलांना या योजनेतून वर्षाला १८ हजार रुपये मिळणार आहेत. ग्रामीण भागातील बहुतांशी महिला या योजनेला पात्र ठरत आहेत. सरकारने वेळोवेळी अटी शिथिल केल्यामुळे सर्व सीएससी केंद्रांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे काम सुरु झाले आहे. पिक विमा आणि माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांचा एकत्रित ताण सीएससी केंद्रांवर आला आहे.

शेतकरी योजना माहितीचा WhatsApp ग्रुप जॉईन करा
 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

पिक विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. परंतु, लाखो शेतकऱ्यांना अद्यापही पिक विमा अर्ज भरता आलेले नाहीत. १४ जुलैपर्यंत १ कोटी ३६ लाख विमा अर्ज दाखल झाले होते, तर मागील वर्षी १ कोटी ७० लाख अर्ज आले होते. त्यामुळे अजूनही लाखो शेतकऱ्यांना विमा अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

शेतकरी योजना माहितीचा WhatsApp ग्रुप जॉईन करा
 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

शेतकऱ्यांच्या मागणीला लक्षात घेऊन कृषी विभागाने केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडे पिक विमा अर्ज भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. सर्व विमा कंपन्यांनी या मागणीला पाठिंबा दिला होता.

राज्य सरकारच्या 1 रूपयात पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 15 जुलैपर्यंत मुदत होती. मात्र, केंद्र सरकारने आता या योजनेला 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत पिक विमा भरता येणार आहे. केंद्रीय कृषी विभागाचे संचालक चंद्रजीत चेटर्जी यांनी याबाबतचे पत्र काढले आहे.

शेतकरी बांधवानो शेतकरी योजना माहितीचा WhatsApp ग्रुप जॉईन करा
👇 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👇

WHATSAPP GROUP LINK

Leave a Comment