pik vima last date : पिकांसाठी विमा घेण्याची आज शेवटची संधी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आजच अर्ज भरावा लागेल. नैसर्गिक आपत्तींच्या वाढत्या प्रमाणामुळे पीकविमाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. पीकविमा योजनेत काही सुधारणा झाल्या असल्या तरी, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अपेक्षित न्याय मिळताना दिसत नाही.
शेतकरी योजना माहितीचा WhatsApp ग्रुप जॉईन करा
👆 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👆
गेल्या चार दिवसांमध्ये, ११ जुलैपर्यंत राज्यातून एक कोटी तीन लाख अर्ज दाखल झाले होते. गेल्या वर्षी खरीप हंगामात एकूण एक कोटी ७० लाख अर्ज आले होते. या वर्षी पावसाच्या विलंबामुळे सुरुवातीला कमी अर्ज आले होते. परंतु, जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे (pik vima last date 2024 is 15 July) आज शेवटच्या दिवशी अर्जदारांची संख्या दीड कोटींवर जाईल असा अंदाज आहे.
एक रुपयात पीकविमा? pik vima last date
शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा असा प्रचार करण्यात आला असला तरी, प्रत्यक्षात त्यासाठी १०० ते ५०० रुपये आकारले जात आहेत. हे शेतकऱ्यांची लूट आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी या अवैध आकारणीचे समर्थन केले होते. सीएससी यंत्रणेद्वारे केंद्रचालकांची आर्थिक कोंडी होत असल्याचे नुकतेच समोर आले आहे.
शेतकरी योजना माहितीचा WhatsApp ग्रुप जॉईन करा
👆 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👆
कोणत्या पिकांना किती विमा? pik vima last date
या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके आणि नगदी पिकांना विमा संरक्षण दिलं जातं. खरीप हंगामात भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उदीड, तूर, मका यांचा समावेश होतो. गळीत धान्य पिकांमध्ये भूईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, तर नगदी पिकांमध्ये कापूस आणि कांदा यांचा समावेश होतो.
शेतकरी योजना माहितीचा WhatsApp ग्रुप जॉईन करा
👆 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👆
रबी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, गळीत धान्य पिकांत उन्हाळी भूईमूग, तर नगदी पिकांत रबी कांदा यांचा समावेश होतो. अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी खरीप हंगामात विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के हप्ता, तर रबी हंगामासाठी १.५ टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागेल. नगदी पिकांसाठी ५ टक्के हप्ता भरावा लागेल.
शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करून आपल्या पिकांचे संरक्षण सुनिश्चित करावे.
शेतकरी बांधवानो शेतकरी योजना माहितीचा WhatsApp ग्रुप जॉईन करा,👇 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.