Panjab Dakh: पंजाब डख स्पष्टच बोलले, परतीचा पाऊस!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh: पंजाबराव डख स्पष्टच बोलले, परतीचा पाऊस!

Weather News: मागील २ महिने कोरडे गेल्यांनतर पावसाने परत एकदा महाराष्ट्रामध्ये दमदार हजेरी लावली आहे. मागील दोन महिन्यात हाताशी आलेली पिके जसे सोयाबीन, कपाशी हे उन्हाच्या तडाख्यात वळायला सुरु झाले होते बऱ्याच शेतकरी बांधवानी पाणी देऊन पिके जगवली तर काही ठिकाणी सौम्य स्वरूपाचा पाऊस पडल्याने ती जगली आहेत. आता परत पावसाच्या झालेल्या आगमनामुळे आता पिके जाणार नाहीत अशी परिस्थिती दिसत आहे.

राज्यात विविध ठिकाणी परत पाऊस सुरु झाला आहे. बऱ्याच ठिकाणी तर अतिशय जास्तीचा पाऊस झाला आहे जसे नागपूर भागामध्ये.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी यापूर्वी दिलेल्या हवामान अंदाज मध्ये संसीतले होते कि गणपती आहेत तोपर्यंत पाऊस पडणार आहे आणि हे एकदम सत्य झाले आहे.

पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज दिलेला आहे तो खालीलप्रमाणे आहे.

हवामान अभ्यासक पंजाबराव डंख असे सांगतात कि राज्यात २६,२७,२८,२९,३० व १ तारखेपर्यंत विविध भागात जोरदार ते अति मुसळ धार पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवानी हा अंदाज लक्षात घेऊन पुढील शेतीचे कामे नियोजन करावे.

तसेच या वर्षीचा मान्सून ४ तारखेपासून माघार घेणार आहे.

तसेच ५ तारखेपासून हवामान कोरडे राहणार आहे.

यावर्षी सोयाबीन काढणीला मान्सून विश्रांती घेईल व सर्वांची सोयाबीन काढणी होईल.

यावर्षी नवरात्रामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे.

राज्यात २६,२७,२८,२९,३० व १ तारखेपर्यंत कोण कोणत्या भागात पडणार पाऊस ?

तर या वरील तारखे दरम्यान पाऊस सर्व भागामध्ये भाग बदलत पडणार आहे.

अति पाऊस पडणार आहे ते जिल्हे

मुंबई , नाशिक, संपूर्ण कोकण पट्टी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, लातूर, अहिल्यानगर, संभाजी नगर, नांदेड या जिल्ह्यामध्ये खूप चांगला पाऊस पडणार आहे.

तसेच कोल्हापूर भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या गुरांची काळजी शेतकरी बांधवानी घ्यावी. व याठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे.

ज्या शेतकरी बांधवांची सोयाबीन काढायला आले आहे त्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे कि ५ तारखेपासून एकदम कोरडे वातावरण राहणार आहे व कडक ऊन पडणार आहे. सोयाबीन काढले तर एक दिवस वाळवून लगेच झाकून ठेवावे.

तसेच यावर्षीही सोयाबीन काढणीच्या वेळेस अंदाज देण्यात येतील व सोयाबीनचे नसून होऊ देणार नाही असे पंजाबराव यांनी हवामान अंदाजमध्ये सांगितले आहे.

तरी सर्व शेतकरी बांधवानी वरील हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची संपूर्ण माहिती.

पूर्वी सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळी ७ च्या बातम्यात हवामान अंदाज देण्यात येत यायचा. पण हा हवामान अंदाज विभागवार असायचा यात जिल्ह्यनुसार माहिती नसायची. व सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा अंदाज पोहचायचं पण नाही त्यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान व्हायचे. पण नंतर शेतीसाठी हवामान अंदाज महत्वाचा ठरू लागला कारण हवामान अंदाज जर शेतकरी बांधवाना मिळू लागला तर शेतकरी बांधव शेतातील कामाचे नियोजन त्याप्रमाणे करून होणार नुकसान टाळता येते. पण हवामान अंदाज मिळण्याचे साधन फक्त हवामान विभाग होते, पण मागच्या काही दिवसापासून पंजबराव डंख यांचे हवामान अंदाज येऊ लागले व ते जिल्ह्यावर असत व अचूक असत त्यामुळे शेतकरी बांधवांचा यात फायदा होऊ लागला.

पंजाबराव डख हे मागच्या २२ वर्षांपासून हवामान चा अभ्यास करतात. पंजाबराव डख हे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील धामणगाव गुगळी या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून ते शेती करतात. पण त्यांना नेहमी सावकाळी पावसामुळे होणारे शेतकरी बांधवांचे नुकसान होणारे पाहवायचे नाही व त्यांनी हवामानाचा व निसर्गाचा अभ्यास सुरू केला. पूर्वी पंजाबराव डंख नियमित हवंच भ्यास करत व त्यांचे वर्षनुवर्षाचे निरीक्षणे नोंदवत होते. हवामान विभागाचे अंदाज पण नियमित पाहत होते. पुढे त्यांच्या या अभ्यासामुळे त्यांना हवामानाची सखोल माहिती व बदलणाऱ्या वातावरणाची सखोल समाज निर्माण झाली व त्यांनी हवामानाचे अंदाज द्यायला सुरवात केली व त्यांचे अंदाज अगदी बरोबर ठरू लागले.

तेंव्हा त्यांच्या लक्षात आले कि आपल्या सर्व शेतकरी बांधवाना जर अंदाज दिला तर त्यांना शेतीचे कामाचे नियोजन करणे सोपे जाईल व नुकसान टाळता येईल.
मग पंजाबराव यांनी व्हाट्सअप वर पावसाची वेळ स्थळ ठिकाण पावसाचे प्रमाण इत्यादी चे अंदाज द्यायला सुरवात केली. आणि बघता बघता पंजाबराव डख हे शेतकऱयांचे गळ्यातले ताईत बनले.

पंजाब डख यांचे हवामान हवामान अंदाज कुठे दिले जातात ?

पंजाब राव डख यांचे हवामान अंदाज अतिशय सोप्या भाषेत त्यांचे हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप, युट्युब इत्यादींवर शेयर केले जातात.

पंजाब डख यांचे हवामान अंदाज वर शेतकरी बांधवांचा विश्वास का आहे ?

पंजाबराव डंख यांचे हवामान अंदाज मागच्या काही वर्षांपासून एकदम अचूक झाले आहेत. यामुळे महारष्ट्रातील शेतकरी भावांचे पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाज मुळे खुप नुकसान टळले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा पंजाबराव डंख यांच्यावर गाढा विश्वास आहे.

पंजाबराव डख यांनी आतापर्यंत दिलेल्या अंदाजमुळे अनेक शेतकरी बांधवांचे अतिवृष्टी, गारपीठ,अवकाळी पाऊस यामुळे होणारे लाखोंचे नुकसान टळले आहे तसेच हजारो शेतकरी बांधवानी अंदाजनुसार शेतीचे नियोजन केले आहे.

पंजाब डख हवामान अंदाजामुळे होणारे फायदे

हवामान अंदाज पाहून शेती केल्याने होणारे नुकसान टळले जाते. तसेच शेतीच्या कामाचे नियोजन योग्य पद्धतीने करून उत्पादन क्षमता वाढवता येते.

2 thoughts on “Panjab Dakh: पंजाब डख स्पष्टच बोलले, परतीचा पाऊस!”

  1. अतिशय चागली महती आहे,शेती व शेतकरी यांना अती महत्त्वाची आहे, या मुळे शेतकरीवरगाचे नुस्कान होत नाही
    धन्यवाद साहेब,

    Reply

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp