pune news: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांद्याच्या प्रश्नावर पुन्हा एकदा हस्तक्षेप केला आहे. शुक्रवारी, वाणिज्य मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी एक अधिसूचना जारी केली की कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम राहील. त्यामुळे निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांना 3000 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
केंद्राने यापूर्वीच कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क जाहीर केले होते, त्यानंतर किमान निर्यात किंमत $८०० प्रति टन आणि ७ डिसेंबरपासून संपूर्ण निर्यात बंदी. निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांसह सर्व व्यापारी, निर्यातदार, वाहतूकदार, मजूर अडचणीत आले आहेत.
कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मात्र, आज मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला एव्हरेज 1460 रुपये. याशिवाय पेण बाजार समितीत लाल कांदा १८०० रुपयांना विकला जातो.
निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांना 106 दिवसांत त्यांचा उत्पादन खर्चही भरावा लागला नाही. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवकच झाली नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे निर्यातबंदीमुळे प्रचंड नुकसान सोसणाऱ्या कांदा उत्पादकांच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
प्रमुख बाजारपेठातील कांदा बाजारभाव
कोल्हापूर 1200
अकोला 1100
छत्रपती संभाजीनगर 1100
चंद्रपूर – गंजवड 1500
कापूस भावात बदल; पहा आजचा कापूस भाव!
मुंबई 1350
दौंड-केडगाव 1300
राहता 1300
हिंगणा 1800
जुन्नर 1550
आळेफाटा 1550
चिंचवड 1550
कराड 1500
सोलापूर 1300
अमरावती 1250
धुळे 1170
जळगाव 1200
मालेगाव 1250
नंदूरबार 1080
सिन्नर 1400
सिन्नर 1350
मनमाड 1200
पेन 1800
पाथर्डी 1200
भुसावळ 1200
यावल 1060
दिंडोरी-वणी 1300
देवळा 1275
सांगली 1100
पुणे 1150
पुणे -पिंपरी लोकल 1400
पुणे-मोशी 1100
जामखेड 900
येवला 1370
नाशिक 1400
लासलगाव 1460
लासलगाव 1450
मालेगाव 1300
कळवण 1151
संगमनेर 931
चांदवड 1390
मनमाड 1350
सटाणा 1310
पिंपळगाव 1425
पिंपळगाव(ब) 1350
गंगापूर 1397
देवळा 1325
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.