Numerology: ज्योतिषशास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोक बुद्धिमत्तेने ओतप्रोत भरलेले असतात. हे लोक हृदयाने अत्यंत चांगले असतात, परंतु आत्मविश्वासाची कमी जाणवते.
Numerology मूलांक 2 चे रहस्य: अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या जातात. यामध्ये मूलांक 2 असलेल्या लोकांच्या काही विशेष गुणधर्मांचा उल्लेख आहे. कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.
hdfc bank home loan: कमी EMI मध्ये स्वतःचे घर !
एचडीएफसी बँकेची ही ऑफर तुमच्यासाठीच आहे
👆 येथे क्लिक करा व पहा 👆
चंद्राचा स्पर्श: Numerology मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे. चंद्राच्या प्रभावामुळे, हे लोक अत्यंत शांत, दयाळू आणि साधे असतात. त्यांच्या मनात खोट नसते. हे लोक सुंदर व्यक्तींकडे सहज आकर्षित होतात. चला, या मूलांकाबद्दल आणखी काही वैशिष्ट्ये पाहूया.
असाधारण बुद्धिमत्ता: Numerology 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचे बौद्धिक कौशल्य विशेष असते. त्यांच्या या गुणवत्तेमुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होतं. जिथे जातात तिथे त्यांना सन्मान मिळतो. बुद्धीच्या जोरावर हे व्यक्ती आपलं उद्दिष्ट साध्य करू शकतात.
पैशाचे कुशल व्यवस्थापन: Numerology मूलांक 2 चे लोक पैशाचे व्यवस्थापन करण्यात कुशल असतात. त्यांना पैशांची किंमत कळते, त्यामुळे ते उधळपट्टी करत नाहीत. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी शोधण्यात ते पारंगत असतात. नोकरी-व्यवसायात या लोकांना उत्तम यश मिळतं.
आत्मविश्वासाची कमतरता: Numerology मूलांक 2 च्या काही लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. हे लोक त्वरित निर्णय घेऊ शकत नाहीत आणि पटकन काही बोलताही येत नाही. त्यांचा स्वभाव बदलत राहतो, आणि अनेकदा त्यांच्यात एकाग्रतेचा अभाव दिसून येतो.
कला आणि व्यवसायातील यश: Numerology मूलांक 2 असलेले लोक नोकरी-व्यवसायात मोठं यश मिळवतात. ते संगीत, गायन, लेखन, कला इत्यादी क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करतात. मृदुभाषी स्वभावामुळे समाजात त्यांची प्रतिमा चांगली असते.
शांतता आणि संयम: या मूलांकाचे लोक स्वभावाने शांत आणि संयमी असतात. कठीण परिस्थितीतही हे लोक आपला संयम राखतात आणि धैर्याने ती परिस्थिती हाताळतात. हे लोक इतरांशी समन्वय साधण्यात तरबेज असतात आणि नेहमी इतरांच्या मदतीसाठी तत्पर असतात.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.