Namo Shetkari Maha Sanman:महाराष्ट्रातील जवळपास एक कोटी शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये लवकरच मिळणार आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील कृषी महोत्सवात ही मोठी घोषणा केली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते 21 ऑगस्टला हा हफ्ता वितरण करण्यात येणार आहे.
कांदा कडाडला
पहा कांद्याचे बाजार भाव !
सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी नवे अनुदान आणि पोर्टलचे उद्घाटन
याच कार्यक्रमात राज्य शासनाने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी नव्याने सुरू केलेल्या पोर्टलचे अनावरण देखील होणार आहे. लाडक्या बहिणींच्या रक्षाबंधनानंतर आता शेतकरीही शासनाच्या विशेष सन्मानाचे लाभार्थी ठरणार आहेत.
परळी वैद्यनाथ येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन
परळी वैद्यनाथ येथे 21 ऑगस्टपासून 25 ऑगस्टपर्यंत पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हा महोत्सव होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवारी दुपारी 1 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
मुख्य अतिथी आणि मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर उभारलेल्या भव्य सभामंडपात हा कार्यक्रम होणार आहे, ज्याला स्व. पंडित अण्णा मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे.
कृषी महोत्सवाचे विविध आकर्षण
या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रमांची योजना करण्यात आली आहे. यामध्ये कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, धान्य महोत्सव, शेतकऱ्यांचा सन्मान, महिला बचत गटांनी बनवलेल्या उत्पादनांची विक्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, आणि सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे.
परळी नगरी सज्ज
या महोत्सवात राज्यभरातून शेतकरी आणि शेतीत रस असणारे नागरिक सहभागी होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण परळी नगरी सज्ज झाली आहे. बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच होणाऱ्या या कृषी महोत्सवासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभागाने जय्यत तयारी केली आहे.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
राज्यस्तरीय कृषी महोत्सव हा शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे, जिथे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळेल. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.