Nag Panchami :श्रावण महिना सुरू झाला की, सणांचा आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येक घर सज्ज होते. या सणांमध्ये नागपंचमीचं एक खास स्थान आहे. या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यादिवशी खास नैवेद्य तयार केला जातो, पण त्यासाठी काही विशेष नियम आहेत. हे नियम का पाळले जातात, त्यामागची कथा तुम्हाला सांगतो.
लगातार तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत धडाधड घसरण; पहा तुमच्या बाजारपेठेतील भाव पहान्यासाठी येथे क्लिक करा
Nag Panchami :श्रावण वद्य पंचमी, म्हणजेच नागपंचमीचा दिवस. यावर्षी नागपंचमी ९ ऑगस्टला आहे. अनेकांनी लहानपणापासून ऐकलं आहे की, नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, तळू नये, भाजू नये, आणि जमिनीवर नांगर फिरवू नये. या नियमांचं पालन का करायचं? यामागे आहे एक सुंदर कथा.
कांदा निर्यात मंदावली, पहा कांद्याला काय भाव मिळतोय पहाण्यासाठी येथे क्लिक करा
Nag Panchami :!एका वेळेस, एक शेतकरी आपल्या शेतात जमीन नांगरत असताना, नांगराच्या फाळानं एका नागाच्या बिळात घुसून त्याच्या पिल्लांचा जीव घेतला. नागाच्या बिळात परतलेल्या नागिणीला आपल्या पिल्लांचा मृतदेह पाहून क्रोध आला. त्या रागात, तिनं शेतकरी, त्याची पत्नी, आणि मुलांना दंश करून मारलं. शेतकऱ्याची एक विवाहित मुलगी होती, जी आपल्या घरी होती. नागिण तिच्या शोधात पोहोचली. पण तेव्हा ती मुलगी पाटावर चंदनगंधानं नागाचं चित्र काढून त्याची पूजा करत होती. तिच्या मनोभावे केलेल्या पूजेचा प्रभाव नागिणीवर झाला. तिच्या भक्तीमुळे नागिणीचा राग शांत झाला आणि तिनं तिच्या परिवाराला पुन्हा जीवदान दिलं.
3 लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी होणार का ? पहाण्यासाठी येथे क्लिक करा
Nag Panchami :एकदा, एका सावकाराच्या धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता. एकदा तिनं एका सापाला मृत्यूपासून वाचवलं. त्या सापानं तिला हवं तितकं धन दिलं, आणि ती सुखी, समृद्ध जीवन जगू लागली.
Nag Panchami :या कथांमधून आपल्याला कळतं, की आपल्या संस्कृतीत प्रत्येक जीवाचा आदर करण्याची शिकवण दिली जाते. नागपंचमीला चिरणे, तळणे, भाजणे हे टाळण्यामागे हाच संदेश आहे. तरीदेखील, सणाचं औचित्य साजरं करताना मोदक, पुरणपोळी, दिंड, पातोळ्या असे गोड पदार्थ तयार करून नैवेद्य दाखवला जातो.
Nag Panchami :आजच्या काळात, शहरातसुद्धा पावसाळ्यात सापांचं दर्शन घडतं, पण सर्पमित्रांमुळे आता आपल्याला सापांचं भय वाटत नाही. उलट, त्यांना सुरक्षित स्थळी सोडण्याची पुरेशी समाजजागृती झाली आहे. नागपंचमीच्या निमित्ताने, पाटावरच्या रांगोळीच्या नागपूजेसोबतच, खऱ्याखुऱ्या नागांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांनाही गोड खाऊ घातला, तर सणाचा खरा अर्थ अधिक उलगडेल.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.