majhi ladki bahin yojana:लाडकी बहीण योजना अर्जात चूक झाली; जाणून घ्या कसा मिळवता येईल लाभ आणि दुरुस्तीची सोपी प्रक्रिया!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी अर्ज करताना महिलांना अनेक प्रश्न पडत आहेत. “अर्जात चूक झाल्यास योजनेचा लाभ मिळेल का?” हा प्रश्न अनेक महिलांच्या मनात आहे.

विरोधातील याचिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला दिला !

महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले जात आहेत. परंतु, अनेक महिला शिक्षीत नसल्यामुळे अर्ज भरताना काही चुका करत आहेत. यामुळे भविष्यात योजनेचा लाभ मिळेल का, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. या संदर्भात, एकदा चूक झालेल्या अर्जात दुरुस्ती करता येते का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

majhi ladki bahin yojana ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्जाची सुविधा

महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. राज्य सरकारच्या नारी शक्ती अॅपच्या माध्यमातून तसेच ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज दाखल करता येतो. ऑनलाइन अर्जाची व्हेरिफिकेशन प्रक्रिया झाल्यावर अर्जात चुका असल्यास त्यात बदल करता येतो का, हा प्रश्न महिलांना पडतो आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू; जाणून घ्या कसा मिळेल लाभ!

majhi ladki bahin yojanaपेंडिंग टू सबमीटचा अर्थ काय?

अर्ज भरल्यानंतरही दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध आहे. नारी शक्ती अॅप आणि लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर अर्ज सबमिट केल्यानंतर “In Pending To Submitted” असा स्टेटस दिसतो. याचा अर्थ तुमचा अर्ज सबमिट झाला असून तो प्रशासकीय पातळीवर पडताळला जात आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार देणार 10 हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान, यादी जाहीर

majhi ladki bahin yojana असा करा फॉर्म दुरुस्त

“In Pending To Submitted” ऑप्शनखाली अर्ज दुरुस्त करण्याची संधी आहे. निळ्या पट्टीमध्ये “In Pending To Submitted” आणि त्याच्या खालच्या केशरी पट्टीत “Edit Form” असा ऑप्शन दिसतो. या ऑप्शनवर क्लिक करून अर्जात हवे ते बदल करून तो पुन्हा सबमिट करता येतो.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज दाखल केले असून, सर्व अर्जांची सध्या छाननी सुरू आहे. लवकरच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

Leave a Comment