Mahindra Thar RWD: महिंद्रा थार चं कमी किमतीचं नवीन मॉडेल लॉन्च; किंमत बघून थक्क व्हाल !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahindra Thar RWD : महिंद्रा थारचा नवीन किफायतशीर व्हेरियंट भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स पाहा

Mahindra Thar RWD : महिंद्राने आपल्या ग्राहकांसाठी थारचा नवीन, कमी किमतीचा व्हेरियंट भारतात लाँच केला आहे. जाणून घ्या अधिक माहिती. महिंद्रा थार RWD (रियर-व्हील ड्राइव) भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच करण्यात आली आहे. या कारची प्रारंभिक किंमत ९.९९ लाख रुपये आहे, जी १३.४९ लाख रुपये एक्स-शोरूम पर्यंत जाते. ही एसयूव्हीची इंट्रोडक्ट्री किंमत असून फक्त १० हजार बुकिंगसाठी ही किंमत मान्य असेल.

महिंद्रा थारच्या फोर-व्हील ड्राइव व्हर्जनची क्षमता वाढवली आहे. नवीन व्हेरियंटची डिलिव्हरी १४ जानेवारी २०२३ पासून सुरू होईल. महिंद्रा थार RWD ला D117 CRDeइंजिनसोबत आणले आहे, जे 117 BHP पॉवर आणि 300 Nm टॉर्क निर्माण करते. तसेच मॅन्यूअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. mStallion 150 TGDiइंजिनसोबत पेट्रोल व्हर्जन देखील आहे, जे 150 BHP आणि 320 Nm टॉर्क जनरेट करते. हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. महिंद्रा थार RWD दोन नवीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Mahindra Thar RWD : ग्राहकांसाठी किफायतशीर व्हेरियंट

Mahindra Thar RWD

महिंद्राच्या मते, कमी किमतीत Thar RWD आता ग्राहकांसाठी एक मोठी रेंज देते. ज्यांना एसयूव्हीच्या ऑल व्हील ड्राइव क्षमतेचा वापर करण्याची आवश्यकता नाही. महिंद्रा अँड महिंद्राचे प्रेसिडेंट, ऑटोमोटिव्ह डिव्हिजन, विजय नाकरा म्हणाले की, नवीन Thar RWD व्हेरियंट आणून आम्ही थार लाइफ हवी असलेल्या लोकांसाठी एक खास ऑप्शन दिला आहे.

Mahindra Thar RWD : किंमतीत मोठा फरक

Mahindra Thar

Thar 4WD एसयूव्हीला २०२२ मध्ये मोठ्या धुमधडाक्यात लाँच करण्यात आले होते. ही एसयूव्ही आता अडवॉन्स्ड इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियलसोबत येते. परंतु, 4WD आणि RWD दरम्यान किंमतीत फरक आहे. सर्वात स्वस्त थार डिझेल AX(O) 4X2 MT ची किंमत ९.९९ लाख रुपये आहे, जी थार डिझेल एसी (ओ) 4X4 MT व्हेरियंटच्या तुलनेत जवळपास ४.१५ लाख रुपये कमी आहे. याची किंमत १३.१५ लाख रुपये आहे. तसेच पेट्रोल LX 4X2 AT ची किंमत १३.४९ लाख रुपये आहे, जी थार LX 4X4 AT पेक्षा २.३३ लाख रुपये कमी आहे.

Mahindra Thar RWD : लूक आणि डिझाइन

Mahindra Thar RWD engine

महिंद्रा थारच्या नवीन कारच्या लूक आणि डिझाइनमध्ये Mahindra Thar 2WD (रियर-व्हील ड्राइव) मध्ये Thar 4WD मॉडेलच्या तुलनेत फारसा फरक नाही. एक्सटीरियर लूकमध्ये फक्त 4X4 बैजिंग दिली नाही. आतील बाजू समान आहे. ऑफ रोड सेक्शनसाठी गियरबॉक्स नाही.

Mahindra Thar RWD : व्हेरियंट्सच्या किंमती आणि फीचर्स

Mahindra Thar INTERIAR

महिंद्रा थार एसयूव्हीचे नवीन व्हेरियंट हार्ड टॉप व्हर्जनमध्ये आणले आहे. यात इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियल, रोल ओव्हर मिटिगेशनसोबत ईएसपी आणि रियर व्हील ड्राइव्ह व्हेरियंटसाठी खास हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर्स आहेत. व्हील साइज १६ इंच स्टील ऑल किंवा १८ इंच अलॉयचा ऑप्शन आहे.

Mahindra Thar RWD : व्हेरियंट्सच्या किंमती

AX (O) RWD-Diesel MT- Hard top: ९.९९ लाख रुपये, LX RWD-Diesel MT-Hard top: १०.९९ लाख रुपये, LX RWD-Petrol AT-Hard top: १३.४९ लाख रुपये.

Leave a Comment