Maharashtra Rain Update: सध्याचा पाऊस कशामुळे आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस कसा असेल ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Update: सध्याचा पाऊस कशामुळे आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस कसा असेल ? महाराष्ट्रात आज आणि उद्या मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण पावसाची स्थिती खालीलप्रमाणे असेल:

71 वर्षांनंतर श्रावणाची सुरुवात सोमवारपासून
‘या’ 4 राशींना येणार सोन्याचे दिवस
👆 येथे क्लिक करा व पहा 👆

  • सरासरीपेक्षा अधिक (१०६ टक्के व अधिक) पावसाची शक्यता असलेले जिल्हे: पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नागपूर.
  • सरासरी इतका (९६ ते १०४ टक्के) पावसाची शक्यता असलेले जिल्हे: नंदुरबार, जळगाव, जालना, बीड, नांदेड, परभणी, भंडारा.
  • सरासरीपेक्षा कमी (९० ते ९५ टक्के) पावसाची शक्यता असलेले जिल्हे: धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सांगली, तसेच संपूर्ण विदर्भ (भंडारा व नागपूर वगळता) आणि कोकणातील पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड.

विमा कंपनी म्हणते, ‘सरकारकडूनच येणं बाकी, म्हणून शेतकऱ्यांना देणं होत नाही’!

ऑगस्ट महिन्यातील धरणांची स्थिती:

ऑगस्टमध्ये घाटमाथ्यावर अधिक पाऊस पडणार आहे. त्यामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमधील सह्याद्रीच्या कुशीतल्या सर्व धरणे भरून ओसंडतील. गोदावरी खोऱ्यातील सर्व जल स्रोतांचे प्रवाह जायकवाडीच्या उदरातच विसावतील. त्यामुळे महाराष्ट्रातील जायकवाडीसह इतर सर्व मोठे जल-प्रकल्प लवकरच भरतील.

राज्यातील ३४ तालुक्यांत होणार डिजीटल क्रॉप सर्वेक्षण; इतर तालुक्यांत होणार ई पीक पाहणी ! पहा तालुक्यांची यादी

येत्या दोन दिवसातील पावसाची स्थिती:

मान्सूनच्या सक्रियतेमुळे गेल्या तीन दिवसांत पाऊस झाला आहे, आणि आज व उद्याही (४ व ५ ऑगस्ट) महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पर्जन्यछायेतील प्रदेशातही समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे. मंगळवार, ६ ऑगस्टपासून कोकण व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर कायम राहील.

सध्याच्या तीन दिवसातील पाऊस कशामुळे?

१) अरबी समुद्रात, विशेषतः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर, सम हवेच्या दाब जोडणाऱ्या प्रत्येक दोन आयसोबार्समधील अंतर कमी झाल्यामुळे प्रेशर ग्रेडिएंट बळकट झाला आहे. परिणामी, पश्चिमी मान्सूनी वाऱ्यांचा वेग ताशी ३५ ते ७५ किमीपर्यंत वाढून कोकण किनारपट्टीवर आदळत आहे.

२) सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर बळकट प्रेशर ग्रेडिएंटच्या द्रोणीय आसामुळे घाटमाथ्यावर पाऊस पडत आहे.

खरीप पिके:

सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असलेल्या महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांतील खरीप पिकांना ऑगस्टमध्ये पावसाची ओढ बसण्याची शक्यता आहे. मात्र, कमी पावसाच्या शक्यतेतही पावसाचे वितरण समान झाले, म्हणजे पावसाळी दिवसांची संख्या वाढली, तर पिकांना दिलासा मिळू शकतो. विशेषतः नगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांत पावसाची परिस्थिती जैसे थेच राहण्याची शक्यता आहे.

  • माणिकराव खुळे, पूर्वानुमान तज्ञ (निवृत्त) IMD पुणे

Leave a Comment