Maharashtra Monsoon Forecast महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झालेला असला तरी पुढील काही तासांत काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. IMD च्या अंदाजानुसार, बीड, लातूर, सांगली, सातारा, यवतमाळ, आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
तातडीचा संदेश | हवामान विभागाचा इशारा
महाराष्ट्रात 18 ऑगस्टपासून या भागांत भयंकर पाऊस
कोकण प्रदेशातही हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण कोकणात विशेषतः विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईत काही ठिकाणी हवामान ढगाळ राहील असा अंदाज आहे आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
विदर्भातही आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे, ज्यामध्ये वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी पर्यंत जाऊ शकतो.
साप्ताहिक राशिभविष्य | या तीन राशींच्या आयुष्यात पडणार
पैशाचा पाऊस; पहा या आठवड्याचे राशिभविष्य !
मराठवाड्याबाबत बोलायचं झाल्यास, या भागातही आज पावसाचा अंदाज आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
एकूणच, महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झालेला असला तरी, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा धोका कायम आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
Gold Rate Today केरळ ते काश्मीर सोन झालं स्वस्त
पहा आजचा तुमच्या बाजारातील भाव !
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.