ladki bahini yojana: लाडकी बहीण योजना, मंत्रिमंडळ बैठकीत 6 नवे बदल; पहा महत्वाची अपडेट !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahini yojana: राज्य सरकाराच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  योजनेच्या अंमलबजावणीसाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत आशा स्वयंसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजनेसह विवाहित महिलांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले आहेत.

भारतातील सर्वात जास्त पगार देणाऱ्या नोकऱ्या
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆

आशा स्वयंसेविकांसाठीच्या अनुदान योजनेंतर्गत ऑनड्यूटी अपघातात मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. याशिवाय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. 

आजच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय:

1. योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते आवश्यक.

2. परराज्यात जन्मलेल्या महिलेला महाराष्ट्रात विवाह झाल्यास पतीच्या कागदपत्रांवरून लाभ मिळणार.

3. ग्रामस्तरीय समिती प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करणार.

4. केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला ऑफलाईन अर्ज भरावा लागणार.

5. नव विवाहित महिलेची विवाह नोंदणी शक्य नसल्यास पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल.

6. ओटीपी चा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात येणार.

लाडकी बहीण योजना
या दिवशी जमा होणार पहिला हफ्ता
येथे क्लिक करा व पहा

या निर्णयांनुसार, तात्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, 15 ते 19 ऑगस्टदरम्यान महिलांना योजनेचा लाभ म्हणून 2 महिन्यांची रक्कम 3000 रुपये थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पारदर्शक आणि सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.

WHATSAPP GROUP LINK

Leave a Comment