ladki bahin yojana:सिल्लोड येथे शुक्रवार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दोन लाख लाभार्थींचे अर्ज मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर: लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राहील, त्यामुळे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या योजनेविरोधात ‘सावत्र भावांनी’ काही जणांना न्यायालयात पाठविले आहे, पण न्यायालयही योजनेस न्याय देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सिल्लोड येथे लाडकी बहीण योजनेत दोन लाख अर्ज मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात लाभार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलिंडर – ई-केवायसी आवश्यक
सरकार महिलांना आर्थिक, सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच विरोधकांकडून खोटा प्रचार सुरू करण्यात आला आहे. ही योजना केवळ निवडणुकीपुरती नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक महिलेस वार्षिक १८ हजार रुपये मिळतील, त्यामुळे केवळ रक्षाबंधनापुरती ही योजना नाही. याशिवाय तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील आणि मुलींना उच्च शिक्षणही मोफत देण्याची योजना हाती घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ई-पीक पाहणी करा;तरच मिळेल पीक विमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी दिव्या रामदास सपकाळ यांचा फॉर्म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरला. तो फॉर्म जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरी प्रक्रियेसाठी सुपूर्द केला.
ladki bahin yojana लाडकी बहीण विरोधात याचिका
मुंबई: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’मुळे राज्यातील करदात्यांवर आर्थिक बोजा पडणार आहे, असा दावा करून ही योजना रद्द करण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे शुक्रवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. नवी मुंबईस्थित सनदी लेखापाल नावेद मुल्ला यांनी या योजनेला आव्हान दिले आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आणि ‘युवा कार्य प्रशिक्षण’ या योजनांद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करदात्यांच्या आणि सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार टाकला जाणार आहे. योजनेंतर्गत लवकरच निधीवाटपही सुरू होईल, त्यामुळे योजनेला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
या चुका केल्यास खराब होईल तुमचा सीबिल स्कोर; लोन मिळणे होईल कठीण !
मुंबईतून योजनेसाठी सहा लाख अर्ज
मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संपूर्ण मुंबईतून आतापर्यंत सुमारे सहा लाख अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून, छाननीकरिता प्रत्येक विभागामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. प्रतितास ४० अर्जांची छाननी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना दिले आहेत.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात होणार जबरदस्त वाढ ;नेमके किती टक्के वाढणार ?
अर्जांची छाननी वेगाने पूर्ण करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. प्रत्येक विभाग कार्यालयात दहा संगणक उपलब्ध करून स्वतंत्र कक्ष स्थापन करावे, प्रत्येक संगणकावर सकाळी सात ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री अकरा अशा दोन पाळ्यांत काम करावे, प्रत्येक पाळीमध्ये सखोल माहिती असलेल्या पर्यवेक्षकांची नेमणूक करावी असेही निर्देश दिले आहेत.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.