ladki bahin yojana: लाडकी बहीण योजनचे 3000 रुपये यायला सुरुवात, तुमच्या खात्यात अजून 3 हजार आले नाहीत? लवकर ‘हे’ महत्त्वाचं काम करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana: लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात, पात्र महिलांनी त्वरित ‘हे’ महत्त्वाचं काम करावं

ladki bahin yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे पाऊल उचलण्याची गरज आहे.

राज्यातील काही पात्र महिलांच्या खात्यात 3000 रुपयांची पहिली रक्कम जमा झाली आहे, तर काहींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील. परंतु, काही अर्जदार महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. अर्ज फेटाळण्यामागे विविध कारणे असू शकतात, पण एक मुख्य कारण म्हणून बँक खाते आधारशी संलग्न नसणे समोर आले आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँक खाते आणि आधार नंबर लिंक असणे आवश्यक आहे. जे अर्जदार आपले बँक खाते आधारशी संलग्न करू शकले नाहीत, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अशा महिलांनी त्वरित आपले ‘बँक सिडिंग’ स्टेटस तपासावे आणि आवश्यकतेनुसार आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक करावे.

बँक सिडिंग स्टेटस तपासण्यासाठी आणि आवश्यक बदल करण्यासाठी https://uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. योग्य ती कार्यवाही केल्यास पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ लवकरच मिळेल.

Leave a Comment