Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना संकटात; अर्थ विभागाने केला मोठा खुलासा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) संकटात आली आहे. अर्थ विभागाने या योजनेच्या आर्थिक तरतुदींवर चिंता व्यक्त केली आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडताना या योजनेची घोषणा केली होती, ज्यामुळे २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांना महिन्याकाठी दीड हजार रुपये मिळणार होते. राज्यभरातील महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत आणि ही योजना आगामी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरू शकते असे बोलले जात आहे.

Numerology : ‘या’ जन्मतारखेचे लोक असतात प्रचंड हुशार,
जिथे जातात तिथे करतात सर्वांच्या मनावर राज्य !
👆 येथे क्लिक करा व पहा 👆

मात्र, राज्यावर ८ लाख कोटींचे कर्ज असताना योजना कशी राबवायची, असा प्रश्न अर्थ विभागाने उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, अर्थ खाते अजित पवारांकडेच आहे. त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला आहे. मात्र, त्यांचाच विभाग योजनेवर हरकत घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंत्रिमंडळाने योजनेच्या आर्थिक तरतुदींना मंजुरी दिली असली तरी निधी कसा द्यायचा याबाबत अर्थ विभाग चिंतित आहे.

राज्य सरकारच्या अनेक योजना आधीच महिलांसाठी आहेत, जसे की सामाजिक न्याय, आदिवासी विकास, महिला-बालकल्याण विभागाच्या योजना. त्यामुळे एकाच लाभार्थी महिलेला दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मुलगी १८ वर्षांची होताच सरकारकडून १ लाख रुपये देण्यात येतात, ज्यासाठी वर्षाला १२५ कोटी रुपये लागतात. ‘लाडकी बहीण योजने’साठी दरवर्षी ४६ हजार कोटींचा निधी लागणार आहे. हा निधी कसा आणि कुठून मिळवायचा, असा सवाल अर्थ मंत्रालयाने केला आहे.

join whatsapp

महिलांचे बँक खातेच नाही

लाडकी बहीण योजनेसाठी बँक खात्याची गरज आहे. परंतु ग्रामीण भागातील अनेक महिलांकडे बँक खातेच नाही. त्याचबरोबर, अनेक महिलांकडे पॅन कार्ड नसल्यामुळे कागदपत्रे जमा करण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे. बँक खाते उघडणे आणि पॅन कार्ड काढणे या कामांसाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या फोटो स्टुडिओ, ऑनलाइन सेवा केंद्रे, फोटोकॉपी सेंटर आणि बँकांमध्ये महिलांची गर्दी दिसत आहे.

Leave a Comment