Ladki bahin yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: 1 कोटी अर्जदारांमध्ये 15 ते 16 लाख महिलांच्या खात्यात तांत्रिक पडताळणीसाठी पाठवलेला 1 रुपया अजूनही पोहोचलेला नाही. तुमचा अर्ज त्यात तर नाही ना? ते कसे तपासायचे ते जाणून घेऊयात.
अचानक खायचे तेल झाले स्वस्त; बघा 7 व 15 लिटर डब्ब्याचा कमी झालेला दर !
महिला आणि बालकल्याण विभागाच्या तपासणीत 1 कोटी महिला अर्जदारांमध्ये 15 ते 16 लाख महिलांच्या खात्यात तांत्रिक पडताळणीसाठी पाठवलेला 1 रुपया जमा झालेला नाही. यामुळे या महिला अर्जदारांच्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत का? बँक खात्याचा नंबर चुकला आहे का? या सर्व गोष्टी तपासून पाहणं आवश्यक आहे.
“RBI ची मोठी घोषणा: आता तुमचा CIBIL स्कोर होणार वेगाने अपडेट!”
तुमच्या खात्यात 1 रुपया पोहोचला नसेल, तर तुमचा अर्ज या 16 लाख अर्जदारांमध्ये असू शकतो. महिला आणि बालकल्याण विभागाकडून अशा महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. अर्जाच्या स्थितीची माहिती तपासण्यासाठी तुम्ही अर्ज केलेल्या अॅप किंवा वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. काही त्रुटी असल्यास, तुम्हाला त्या संबंधित माहिती मिळू शकते.
1500 रुपये मिळवण्यासाठी तुमच्या अर्जाचा ‘हा’ स्टेटस महत्त्वाचा! अंतिम स्टेटस जाणून घ्या
महत्वाचं म्हणजे, सरकार या अर्जदारांपर्यंत लवकरात लवकर पोहोचून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे 15 ते 16 लाख महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य: “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरण्यास उशीर होत आहे, परंतु महिलांना त्यांचा हक्क मिळेल. आम्ही प्रयत्नशील आहोत की 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा व्हावेत. आतापर्यंत सव्वा कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, आणि हा आकडा वाढतच जाईल.”
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.