ladki bahin yojana: लाडक्या बहिणींनो, अजून 3 हजार रुपये मिळाले नसतील तर; ‘हे’ एक काम करा, पैसे लगेच जमा होतील !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी शिंदे सरकारने सुरु केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांना आता त्यांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. योजनेचा लाभ मिळालेल्या सुमारे 90 लाख महिलांना या योजनेचे पैसे 14 ऑगस्टच्या सायंकाळपासून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

या दिवशी 18व्या हप्त्याचे 6000 रुपये मिळणार?
पहा पीएम किसान योजनेची महत्त्वाची तारीख

तथापि, अनेक महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे जवळपास 27 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. जर तुम्हाला अजूनही या योजनेचे पैसे मिळाले नसतील, तर आजच तुमच्या मोबाईलवरून तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का हे तपासून घ्या.

बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे तपासायचे?

तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी, https://uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. माय आधार या पर्यायावर क्लिक करून, तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाका. रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका आणि ‘Bank Seeding Status’ या ऑप्शनवर क्लिक करा. जर तुमच्या बँकेचे नाव दिसले, तर समजून जा की तुमचे खाते आधारशी लिंक आहे.

रक्षाबंधनला तुमची बँक बंद असेल का;
जाणून घ्या 19 ऑगस्टचा महत्वाचा अपडेट

बँक खाते आधारशी लिंक नसल्यास काय करावे?

जर तुमचे खाते आधारशी लिंक नसेल, तर तुम्ही NPCI संकेतस्थळावर जाऊन लिंक करू शकता. consumer या ऑप्शनवर क्लिक करून, ‘Request For Aadhar Seeding’ वर क्लिक करा. तुमच्या बँकेचे नाव निवडून, खाते क्रमांक टाका आणि कॅपचा कोड भरून अर्ज सबमिट करा. अशा प्रकारे, तुम्ही घरबसल्या तुमचे बँक खाते आधारशी लिंक करू शकता.

Gold Rate Today केरळ ते काश्मीर सोन झालं स्वस्त;
पहा आजचा तुमच्या बाजारातील भाव !

Leave a Comment