Ladki Bahin Yojana:1500 रुपये मिळवण्यासाठी तुमच्या अर्जाचा ‘हा’ स्टेटस महत्त्वाचा! अंतिम स्टेटस जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Approval status: माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजुरीची स्थिती मुंबई: “माझी लाडकी बहीण” योजनेची अर्जदारांची यादी आता प्रसिद्ध झाली आहे. लाखो महिलांचे अर्ज पात्र ठरले असले तरी, प्रत्येक अर्जदाराला 1500 रुपये मिळणार की नाही, हे अर्जाच्या स्थितीनुसार ठरवले जाईल. सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये, तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.

जिवन व आरोग्य विमा होणार स्वस्त ? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वपूर्ण घोषणा 

अर्जाच्या स्थितीचे प्रकार:

  1. प्रलंबित स्थिती (Pending Status): जर तुमच्या अर्जाची स्थिती ‘प्रलंबित’ दाखवली जात असेल, तर याचा अर्थ तुमच्या अर्जाची छाननी प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही.
  2. रिजेक्ट स्थिती (Reject Status): अर्जाची स्थिती ‘रिजेक्ट’ दर्शवली जात असल्यास, तो अर्ज शासनाने अमान्य केला आहे.
  3. पुनरावलोकन स्थिती (Review Status): ‘पुनरावलोकन’ अशी स्थिती दिसत असल्यास, तुमचा अर्ज सरकारकडून तपासला जात आहे.
  4. मंजुरीची स्थिती (Approval Status): जर अर्जाची स्थिती ‘मंजुरी’ असेल, तर तुमचा अर्ज स्वीकारला गेला असून तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातील.

काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळणार नाहीत. तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का, जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

यापैकी मंजुरीची स्थिती असलेल्या अर्जदार महिलांनाच 1500 रुपये मिळतील. मात्र, ज्या अर्जांच्या समोर प्रलंबित किंवा पुनरावलोकन स्थिती असेल, त्या महिलांना काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज प्रलंबित का असू शकतो?

जर तुमचा अर्ज पूर्ण भरलेला असतानाही प्रलंबित स्थितीत दिसत असेल, तर चिंता करण्याचे काही कारण नाही. सध्या तुमचा अर्ज शासकीय प्रक्रियेत आहे आणि त्यावर कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे प्रलंबित स्थिती दिसत आहे. घाई न करता थोडा धीर धरा.

घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त होणार; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर !

रिजेक्ट स्थिती असलेल्या अर्जदार महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीत:

राज्यातील लाखो महिलांनी “माझी लाडकी बहीण” योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. परंतु, काही अर्जांना रिजेक्ट स्थिती प्राप्त झाल्यास त्या महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीत.

अर्जाचे स्टेटस कसे पाहावे?

तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी, “नारी शक्ती दूत” अॅप डाउनलोड करा. अॅप ओपन करून, लॉगिन तपशील भरून लॉगिन करा. त्यानंतर, तुमचा अर्ज क्रमांक किंवा अर्जदार महिलेचे नाव टाकून ‘गेट स्टेटस’ वर क्लिक करा. स्टेटस उघडल्यावर, तुम्ही ‘Approval’, ‘Pending’, ‘Reject’ असे पर्याय पाहू शकता.

Leave a Comment