ladki bahin yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना;सरकारचा दिलासा फसला? 70 टक्के महिलांना मिळणार नाही लाभ, कारण…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana:मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली गेली, पण बहुतेक महिलांना हा लाभ मिळणारच नाही का? कारण तांत्रिक अडचणींच्या मुद्द्यावरून असे दिसत आहे.

राज्यात अजून किती दिवस पावसाचा मुक्काम
पहा पावसाचा अंदाज !

यवतमाळ: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आणि राज्यातील महिलांमध्ये आनंदाची लाट पसरली. या योजनेत महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. पण यात एक मोठा अडथळा आहे, बहुतांश गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर आहेत. त्यामुळे 70 टक्क्यांपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी शंका आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशीच स्थिती आहे. आता सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत त्यांना तीन मोफत गॅस सिलिंडर मिळण्याची घोषणा झाली होती. मात्र, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत वगळता बहुतांश गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर असल्याने ही योजना किती प्रभावी ठरेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

लाखो शेतकऱ्यांना 21 ऑगस्टला मिळणार मोठं गिफ्ट
कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून महत्त्वाची घोषणा

यवतमाळच्या उज्ज्वला वाघमारे यांनी तीन मोफत गॅस सिलिंडर मिळण्याच्या योजनेबद्दल आनंद व्यक्त केला पण त्याबरोबरच त्यांनी गॅस कनेक्शन पतीच्या नावावर असल्याची चिंता व्यक्त केली. हीच समस्या सीमा भारतनेवारे यांनाही भेडसावत आहे. त्यांचे पती बांधकाम कामगार आहेत, पण गॅस कनेक्शन त्यांच्या नावावर नसल्याने आम्हालाही तीन सिलिंडर मिळायला पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावर सरकार काय निर्णय घेणार? हे पाहावे लागेल.

कांदा भाव कडाडला
पहा कांद्याचे बाजार भाव !

Leave a Comment