ladki bahin yojana:लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांनी 5 वर्षांत कसे बनू शकता लखपती? जाणून घ्या सविस्तर!
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना:
महाराष्ट्रात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. योजनेत दरमहा 1500 रुपये राज्यातील महिलांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत, 80 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
लाडक्या बहिणींनो, अजून 3 हजार रुपये मिळाले नसतील तर; ‘हे’ एक काम करा, पैसे लगेच जमा होतील !
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला धन जमा:
स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी, 32 लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे 3000 रुपये जमा केले गेले. रक्षाबंधनच्या आधीच सर्व पात्र महिलांना ही रक्कम मिळेल, अशी ग्वाही सरकारने दिली आहे.
देशभरात या योजनेचे कौतुक:
मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी ही योजना यशस्वीपणे राबवली होती, आणि तिची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारनेही तिचे अनुकरण केले आहे.
या तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशाचा पाऊस; पहा या आठवड्याचे राशिभविष्य !
योजना निरंतर:
या योजनेचा लाभ 5 वर्षांसाठी मिळणार आहे, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ही योजना ठराविक काळासाठी मर्यादित नसून निरंतर असेल.
चक्रवाढ व्याजाचा फायदा:
आता, तुम्ही या 1500 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही 5 वर्षांत लखपती कसे होऊ शकता? सोप्या भाषेत समजून घेऊया. तुमच्या खात्यात जमा होणारे 1500 रुपये SIP (Systematic Investment Plan) म्हणून गुंतवा. यामुळे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा होईल.
गणिताचं विश्लेषण:
दरमहा 1500 रुपये गुंतवले तर एका वर्षात 18,000 रुपये जमा होतील. 5 वर्षांत ही रक्कम 90,000 रुपयांपर्यंत पोहोचेल.
15 टक्के व्याजाचा फायदा:
जर ही रक्कम सलग 5 वर्षांसाठी गुंतवली आणि 15 टक्के व्याजाचा अंदाज धरला, तर 90,000 रुपयांवर 1,31,223 रुपये जमा होतील. याचा अर्थ, लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांनी 5 वर्षांत तुम्ही लखपती बनू शकता.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.